मुंबई, दि. 26 - मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केल्याने या संघातील सदस्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या कामगिरीची चर्चा होत आहे. पण या संघाच्या प्रशिक्षकांची म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. एकीकडे भारतीय पुरुष संघामध्ये प्रशिक्षक पदावरून मानापमान नाट्य रंगलेले असताना महिला संघाच्या प्रशिक्षकांनी मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहात आपली कामगिरी चोखपणे बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. पडद्यामागे राहून संघाला उत्तम मार्गदर्शन कणाऱ्या द्रोणाचार्यांचे नाव आहे तुषार अरोठे.
महिला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी या संघाकडूनच फार अपेक्षा नव्हती. त्यामुळे संघातील खेळाडूंविषयी प्रशिक्षकांविषयी क्रिकेटप्रेमींना फारशी माहिती नव्हती. पण स्पर्धेत दणक्यात कामगिरी केल्यावर भारतीय संघातील खेळाडूंची चर्चा झाली. पण प्रशिक्षम मात्र कुठेच दिसले नाही. पण प्रसिद्धीच्या झोतात न येता तुषार अरोठे यांनी आपली कामगिरी चोख बजावली. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने केलेली कामगिरी आता इतिहास बनली आहे.
सध्या भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत असलेले तुषार अरोठे यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्यादरम्यान ते 114 प्रथमश्रेणी आणि 51 एकदिवसीय सामने खेळले होते. मात्र त्यांना भारतीय संघातून खेळण्याची संघी कधी मिळाली नाही. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी प्रशिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यानंतर काही काळाने त्यांची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
Web Title: you know who is Indian Women's Cricket team Coach
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.