दुबई : मैदानी पंच नितीन मेनन यांनी ‘शॉर्ट रन’ दिल्यानेच दिल्लीविरुद्ध पंजाबचा पराभव झाला, असे मानले जात आहे. किंग्ज पंजाबने या वादग्रस्त निर्णयाविरुद्ध अपील केले. दुसरीकडे माजी खेळाडूंनी अचूक निर्णयासाठी अद्ययावत तंत्राचा उपयोग व्हावा, अशी मागणी केली आहे.
टीव्ही फुटेजनुसार, स्क्वेअर लेग पंच मेनन यांनी १९ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डन याला ‘शॉर्ट’ रन बाब संकेत दिले. जॉर्डनची बॅट क्रीझच्या आत असल्याचे रिप्लेमध्ये दिसत होते. मेनन यांच्या मते मात्र जॉर्डन क्रिझपर्यंत पोहोचला नव्हता. यामुळे मयंक अग्रवाल आणि पंजाबच्या धावसंख्येत केवळ एकच धाव जोडण्यात आली. तांत्रिक साक्ष असताना निर्णय मात्र बदलण्यात आला नाही. अखेरच्या षटकात पंजाबला १३ धावांची गरज होती.
पहिल्या तीन चेंडूंवर मयांकने १२ धावा केल्या. पंजाब संघ एका धावेने माघारला आणि सामना ‘टाय’ झाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली.यावर किंग्ज पंजाबचे सीईओ सतीश मेनन म्हणाले, ‘आम्ही रेफ्रीकडे अपील केले. ही एक धाव आम्हाला ‘प्ले आॅफ’पासून वंचित रोखू शकते. पराभव हा पराभव असतो. हा प्रकार अयोग्य आहे.’अपिलावर निर्णय येण्याची शक्यता कमीच आहे. आयपीएल नियम २.१२ नुसार (पंचांचे निर्णय) पंचांच्या निर्णयावर त्वरित आक्षेप घेतल्यास निर्णय बदलणे शक्य असते. साधारणपणे पंचाचा निर्णय अंतिम समजला जातो.मी ‘मॅन आॅफ द मॅच’च्या निर्णयाशी सहमत नाही. माकर््स स्टोईनिसला नव्हे तर शॉर्ट रन देणाºया पंचाला हा पुरस्कार मिळायला हवा होता.’- वीरेंद्र सेहवाग‘‘तिसºया पंचांनी लक्ष घालून मेनन यांना ‘शॉर्ट रन’ नव्हता, असे सांगायला हवे होते. मेनन यांनी निर्णय बदलला असता तर कुणाचा आक्षेपही नसता.’ -संजय मांजरेकर‘‘तिसºया पंचाने निर्णय घ्यायला हवा होता. तथापि स्पर्धा सुरू होण्याआधी हा नियम बनला तरच शक्य असते.’’ -टॉम मूडी‘ मी नेहमी जय-पराजय खेळभावनेसह स्वीकारण्यावर विश्वास बाळगते. मात्र नियमात बदलाची गरज आहे. जे झाले ते विसरून आता भविष्यात असे होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.’ -प्रीटी झिंटा