- सौरव गांगुली लिहितात...एमसीजीवरील दणदणीत विजयानंतर मालिकेत अखेरचा सामना जिंकण्याकडे भारताची नजर लागली आहे. हा मोठा सामना असेल. सामन्यासह मालिका विजय मिळवून प्रथमच आॅस्ट्रेलियात जिंकण्याच्या निर्धाराने भारत खेळणार आहे. मेलबोर्नमध्ये भारताने पाचही दिवस वर्चस्व गाजवित दिमाखदार विजयाची नोंद केली. संयोग असा की नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणारा संघ सामन्यातही पुढेच राहीला. एमसीजीवर दुसऱ्या डावात भारताने ८ बाद १०६ वर डाव घोषित केल्यानंतर जे यश लाभले त्यावरुन सिडनीतही नाणेफेक जिंकण्याचा भारताला लाभ होईल, यात शंका नाही,सिडनीच्या खेळपट्टीबद्दल बरेच काही बोलले जाते. येथे काही गवत असल्याचे मला कळले. एमसीजीची खेळपट्टीही काहीशी अशीच होती. भारताने सिडनीत दुसरा फिरकी गोलंदाज निवडताना सावध असावे. आॅस्ट्रेलियाने संघात एक अष्टपैलू खेळविण्यास प्राधान्य दिले आहे. या संघाला आघाडीचा क्रम चांगला ठेवावा लागेल. अॅरोन फिंचबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. माझ्यामते त्याचे तंत्र कसोटी सामन्यात फिट बसणारे नाहीच. इशांत शर्मा जखमी झाला ही फिंचसाठी आनंदाची बाब ठरावी. इशांतचा मारा खेळणे फिंचला कधीही जमले नाही. विशेषत: आत येणाºया चेंडूवर त्याची भंबेरी उडायची.भारताने वेगवान गोलंदाजाची उणीव भरुन काढण्यासाठी उमेश यादवला आणले असून अश्विन फिट व्हावा, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. दुसरा फिरकीपटू खेळविण्याआधी मात्र अश्विन पूर्ण फिट आहे का, याची खात्री करुनच पाऊल टाकावे, अन्यथा काही झाल्यास तीन गोलंदाजांवर विसंबून रहावे लागणार आहे. इशांत संघात नसताना भुवनेश्वरला का खेळविले नाही, याचे मला आश्चर्य वाटते. अश्विन, इशांत जखमी असल्याने अंतिम एकादशसाठी भारताची डोकेदुखी वाढली असतानाच आॅस्ट्रेलिया संघातही अनेक समस्या आहेत. गेल्या १५ वर्षांत अशी कमकुवत फलंदाजी कधीही पािहली नसेल. यासाठी टी-२० जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. विलियम्सन, कोहली, स्मिथ, वॉर्नर, रुट, बटलर, आणि बेयरिस्टो हे सर्वजण अनेक टी-२० सामने खेळतात. पण तरीही कसोटीसाठी सज्ज होतात. आॅस्ट्रेलियन फलंदाजांमधील बचावात्मक पवित्रा खराब झाला आहे. ते खेळपट्टीवर स्थिरावण्याचे तंत्र विसरत चालले आहेत. या स्तरावर खेळताना खेळाडूंनी सर्व प्रकारात एकरुप होण्याची किमया साधायलाच हवी. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दुसरा फिरकीपटू खेळविण्याआधी दोनदा विचार करावा
दुसरा फिरकीपटू खेळविण्याआधी दोनदा विचार करावा
एमसीजीवरील दणदणीत विजयानंतर मालिकेत अखेरचा सामना जिंकण्याकडे भारताची नजर लागली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 12:47 AM