मुंबई - भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली जाहिरात विश्वातील सर्वात मोठा ब्रँड आहे. भारतासह परदेशातही त्याचे चाहते आहेत. विराट कोहलीचे खेळामधील सातत्या सोशल मीडियावरही असते. तो रोज काहीना काही पोस्ट करत आसतोच. पण तुम्हाला माहित आहे का? विराट कोहली इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी करोडो रुपये घेतो. फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार, विराट कोहली हा जगातला सर्वात महागडा खेळाडू आहे, त्याला एका इंस्टाग्राम पोस्टचे 3.2 कोटी रुपये मिळतात. खेळाडू खेळात सारखे व्यस्त असले तरी ते त्यांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करतात.
केवळ भारतात नाही, तर जागतिक स्तरावर विराट कोहलीची लोकप्रियता आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीप्रमाणेच त्यांच्या चाहत्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडिया अकाऊंट्सवर क्रिकेटपटूंमध्ये सध्या विराट कोहलीच्याच लोकप्रियतेची चर्चा आहे. ट्विटर अकाऊंटवर कोहलीचे सध्या दोन कोटींहून अधिक फॉलोअर्स असून, त्याच्या फेसबुक पेजच्या चाहत्यांची संख्या 3 कोटी 6 लाखांपेक्षा आधिक आहे. तर इंस्टाग्रामवर दीड कोटीपेक्षा आधिक फॉलोअर्स आहेत.
विराटच्या प्रत्येक इन्स्टा पोस्टवर हजारो कमेंट आणि लाईक्सचा ‘पाऊस’ असतो. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे विराटला दिवसाला जवळपास तीन कोटींची कमाई होते. आपल्या पोस्टमधून एखाद्या ब्रँडला प्रसिद्धी द्यायची असेल तर विराट 3.2 कोटींच्या आसपास मानधन घेतो.
26 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार विराट भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत त्याने प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लायनल मेस्सीलाही मागे टाकलं आहे. बीसीसीआयच्या कराराव्यतिरिक्त तो जाहिरातींमधूनही कोट्यवधी रुपये कमावतो. फोर्ब्स मासिकाच्या आकडेवारीनुसार विराट कोहलीची वार्षिक कमाई 14.5 मिलियन डॉलर आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे.
क्रिकेटमधील विराट कोहलीचे सातत्य कौतुकास्पद आहे. त्याच्यातील सातत्य आणि संघाच्या विजयास कारणीभूत होण्याची वारंवारता या निकषांनुसार तो भारताचाच नाही तर जगातील 'ऑल टाईम्स ग्रेट' फलंदाज बनत आहे.
Web Title: You will be shocked to hear Kohli's huge earnings by the post of Instagram
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.