श्रीलंका दौ-यात ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना जिंकून भारतीय संघाने ९-० अशी जबरदस्त विजयी कामगिरी केली. सर्वांनाच माहीत आहे की, मर्यादित षटकांमध्ये विराट कोहलीला तोड नाही. टी-२० सामन्यातही त्याने शानदार ८२ धावांची खेळी केली. पण, मी ९-० या जबरदस्त कामगिरीचे जास्त कौतुक करेन. या दौ-यातील प्रत्येक सामन्यात भारताने लंकेला नमवले. असे खूप कमी वेळा झाले आहे. क्रिकेटतज्ज्ञांमते याआधी अशी कामगिरी आॅस्टेÑलियाने २००९मध्ये पाकिस्तानविरुद्ध केली होती. पण, जर अशी कामगिरी इतकी दुर्मिळ असेल, तर यावरून दिसून येते, की भारतीय क्रिकेट यशाच्या मार्गावर आहे. तसेच, खास करून कर्णधार म्हणून मी कोहलीचे कौतुक करेल. सलग विजयांमध्ये कर्णधाराचा एक वेगळा वाटा असतो. कारण स्वत:सह संपूर्ण संघाचा जोश कायम ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. कधी कधी मालिका जिंकल्यानंतर काही संघ गांभीर्याने खेळ करत नाही; पण कोहलीच्या संघाने असे केले नाही. जुन्या काळातील वेस्ट इंडीज आणि आॅस्टेÑलिया संघांचा खेळ ज्या प्रकारे होता, तसाच खेळ कोहलीच्या संघाने केला.खेळाडूंच्या एकूण कामगिरीविषयी मी जास्त चर्चा करणार नाही. कारण रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी आणि कोहली यांच्याविषयी न बोलता मी युवा खेळाडूंबाबत जास्त बोलेन. त्यांनी खूप अनुभव या मालिकेतून मिळविला आहे. भविष्यात हे युवा खेळाडू निश्चितच भारताची ताकद बनतील. सर्वप्रथम मनीष पांड्ये, याने मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा उचलला. हा तिशीतला खेळाडू आहे; पण मुख्य संघात त्याला संधी कमी मिळते. परंतु, या वेळी त्याने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या दोन्ही लेगस्पिनरनी लंकन फलंदाजांना चांगलेच सतावले. श्रीलंकन फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यात वाक्बगार असल्याने त्यांची कामगिरी विशेष ठरते. जेव्हा दक्षिण आफ्रिका, आॅस्टेÑलिया आणि इंग्लंड दौºयावर टीम इंडियान जाईल, तेव्हा लेगस्पिनर महत्त्वाचे ठरतील.अखेरीस चर्चा करेन ती जसप्रीत बुमराहची. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत १५ बळी घेणे खूप मोठे यश आहे. त्याची शैली गोंधळून टाकणारी आहेच; मात्र त्यामुळे त्याने बळी मिळविले नाहीत. बुमराहने आपल्या विविधतेच्या आणि कल्पकतेच्या जोरावर यश मिळविले. तो ज्या प्रकारे वेगामध्ये आणि लेंथमध्ये बदल करतो ते शानदार असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो फलंदाजांची मानसिकता जाणून आहे. त्यामुळे मला वाटते, की भविष्यात भारतीय क्रिकेटमध्ये मोठा खेळाडू म्हणून बुमराह नक्कीच ओळखला जाईल.-अयाझ मेमनसंपादकीय सल्लागार
- Cricket Buzz»
- बातम्या»
- युवा खेळाडू भारताची ताकद बनेल
युवा खेळाडू भारताची ताकद बनेल
श्रीलंका दौ-यात ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना जिंकून भारतीय संघाने ९-० अशी जबरदस्त विजयी कामगिरी केली. सर्वांनाच माहीत आहे की, मर्यादित षटकांमध्ये विराट कोहलीला तोड नाही.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:37 AM