Join us

IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?

Vaibhav Suryavanshi, IND vs PAK: नुकताच IPL लिलावात झाला करोडपती, राजस्थान रॉयल्सने घेतलं संघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:50 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi, IND vs PAK : आयपीएल लिलावात सर्वात तरुण खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशी याच्या वर बोली लागली. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला १ कोटी १० लाखांना विकत घेतले. IPL मध्ये वैभवची फलंदाजी बघण्यासाठी अजून बराच वेळ आहे. पण लवकरच तो भारताच्या संघातून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करताना दिसणार आहे. १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत भारताचा १३ वर्षीय स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी एक नवीन सुरुवात करताना दिसणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान कधी?

१९ वर्षाखालील आशिया चषक सामना २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यात स्पर्धेत भारतासह आशियातील ८ संघांचा समावेश आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी, ३० नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.

वैभव सूर्यवंशीसाठी नवी सुरुवात

भारतीय क्रिकेटमध्ये अतिशय वेगाने उदयास आलेल्या आणि आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध झालेल्या वैभव सूर्यवंशीसाठी हा पहिला अंडर-१९ आशिया चषक असेल. या स्पर्धेतून तो निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्येही पदार्पण करणार आहे. वैभवने आजपर्यंत भारताकडून निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकाही चेंडूचा सामना केलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत तो ३० नोव्हेंबरला नवी सुरुवात करणार आहे.

IPL मध्ये भले-भले अनसोल्ड, पण वैभव मात्र करोडपती

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू म्हणून मेगालिलावात उतरलेल्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला. ज्या लिलावात डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन सारखे बडे खेळाडू अनसोल्ड राहिले, त्यात एका चिमुरड्याने करोडपती होण्याचा मान मिळवला. ३० लाखांच्या मूळ किमतीवरून त्याची बोली सुरु झाली होती. अनेक संघांनी त्याला संघात घेण्यासाठी प्रयत्न केला. अखेर राजस्थान रॉयल्स संघाची बोली यशस्वी ठरली. IPL इतिहासातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलेल्या वैभव सूर्यवंशीचे राजस्थानने १ कोटी १० लाखांच्या बोलीसह रॉयल स्वागत केले.

वैभवच्या नावावर आहे विश्वविक्रम

वैभवने ५ जानेवारी २०२४ मध्ये रणजी स्पर्धेत पदार्पण केलं. ज्या शहरात वडिलांनी केवळ उन्हात बसून क्रिकेट खेळणारी मुलं पाहिली, त्याच शहराच्या मातब्बर संघाविरुद्ध त्यांच्या लेकाने पदार्पण केलं. पुढे १९ वर्षाखालील संघात वैभवची निवड झाली आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वैभवने फक्त ५८ चेंडूत १०४ धावा केल्या. १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभवच्या नावावर विश्वविक्रम आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआयपीएल २०२४आयपीएल लिलावराजस्थान रॉयल्स