ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेला लवकरच नववा चॅम्पियन मिळणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जात आहे. आतापर्यंत आठ ट्वेंटी-२० विश्वचषक झाले आहेत. पण, यंदाची ही स्पर्धा नाना कारणांनी खास आहे. यावेळी २० संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. आताच्या घडीला आयसीसी क्रमवारीत भारत जगातील अव्वल क्रमांकाचा संघ आहे. या स्पर्धेत युवा खेळाडूंसह अनुभवी खेळाडूंची फौज आहे.
दरम्यान, विश्वचषक खेळणाऱ्या तरूण आणि सर्वात वयस्कर खेळाडूमध्ये २५ वर्षांचे अंतर आहे. युगांडाचा फ्रँक नसुबुगा सर्वात वयस्कर खेळाडू असून, त्याचे वय ४३ वर्ष २५४ दिवस आहे. १९९७ मध्ये त्याने प्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हा तो अवघ्या १६ वर्षांचा होता. २७ वर्ष त्याने युगांडाचे प्रतिनिधित्व केले आहे, जी एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
नेपाळचा शिलेदार सर्वात तरूण सर्वात तरूण खेळाडूंच्या यादीत नेपाळचा शिलेदार आघाडीवर आहे. १८ वर्ष ७७ दिवस वय असलेला नेपाळचा गुलशन झा विश्वचषकाचा हिस्सा आहे. त्याने २०२१ मध्ये नेपाळच्या आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले. आतापर्यंत त्याने २९ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये १९ बळींसह ३६२ धावा केल्या आहेत. दुसरीकडे २७ वन डे सामन्यांत झाने २१ बळी आणि ५१४ धावा कुटल्या आहेत. तो पेशाने एक गोलंदाज असला तरी फलंदाजी करण्याची त्याच्यात क्षमता आहे. विश्वचषकाच्या पाच गटांपैकी नेपाळचा संघ ड गटात आहे.
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ