Join us  

युवांनी लवकर भारत ‘अ’ संघात स्थान मिळवावे

मुंबई : ‘१९ वर्षांखालील भारतीय संघातील अनेक युवा खेळाडू शानदार असून त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:12 AM

Open in App

मुंबई : ‘१९ वर्षांखालील भारतीय संघातील अनेक युवा खेळाडू शानदार असून त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरली आहे. पुढील ८ महिन्यात या संघातील काही खेळाडू भारत ‘अ’ संघामध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरले, तर ते खूप मोठे यश ठरेल,’ अशी प्रतिक्रीया भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने दिली.बुधवारी न्यूझीलंड येथे १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना होण्याआधी द्रविडने मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी द्रविडने म्हटले की, ‘विश्वचषक स्पर्धा रोमांचक अनुभव असून सर्व युवा खेळाडूंसाठी खूच चांगली संधी आहे. सध्या भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये एक प्रक्रिया सुरु झाली असून यानुसार सर्वप्रथम १९ वर्षांखालील क्रिकेटमधून प्रथम श्रेणी, त्यानंतर भारत ‘अ’ आणि अखेरीस भारताचा वरिष्ठ संघ, अशी निवडप्रक्रिया आहे. मी युवा खेळाडूंसह क्रिकेटच्या दुसºया प्रकारांबाबतही चर्चा करत आहे. जर त्यांनी आगामी ८ महिन्यांमध्ये भारत ‘अ’ संघात स्थान मिळवले, तर त्यांच्यासाठी ही खूप मोठे यश असेल.’ सध्या १९ वर्षांखालील भारतीय संघाची धुरा मुंबईकर पृथ्वी शॉच्या खांद्यावर सोपविण्यात आली असून, त्याने याआधी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.सध्याच्या युवा संघातील खेळाडूंविषयी द्रविडने सांगितले की, ‘१९ वर्षांखालील व भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक म्हणून मी खूप शिकलो आहे. हे सर्व खेळाडू पुढची पिढी असून सर्वांचे विचार खूप वेगळे आहेत. या खेळाडूंना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारानुसार स्वत:च्या खेळात बदल करावा लागतो. मी आत्ताच कोणता खेळाडू पुढे जाईल आणि कोणता खेळाडू जाणार नाही, हे सांगू शकत नाही. पण, सर्व खेळाडूंमध्ये आपल्या राज्याचे व भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे.’>... म्हणून हार्दिकला मिळाली संधीसध्या अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या भारतीय संघामध्ये निर्णायक भूमिका बजावत आहे. परंतु, भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूची कमतरता असल्याने हार्दिकला खूप लवकर टीम इंडियामध्ये संधी मिळाल्याचे मत द्रविडने व्यक्त केले.द्रविडने यावेळी म्हटले की, ‘हार्दिकने आपल्या कौशल्याच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्याने स्वता:ला सिद्ध केले आहे आणि त्याच्याकडे हा गुण आहे.भारतामध्ये वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूला आव्हान देणारे खूप कमीजण असतात आणि ही वस्तुस्थिती आहे. त्याचवेळी, फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडूला तुलनेत खूप मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागते.’

टॅग्स :राहूल द्रविडक्रिकेट