पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू युनिस खान यानं चक्क फलंदाजी प्रशिक्षकाच्या गळ्यावर चाकू धरल्याची घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ग्रँड फ्लॉवर यांनी 2014 ते 2019 या कालावधीत पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानी संघासोबत काम करणं आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगताना त्यांचा सल्ला ऐकला जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
क्रिकेट पोडकास्टवर बोलताना फ्लॉवर यांनी एक प्रसंग सांगितला. त्यात फ्लॉवर हे युनिस खान यांच्यात फलंदाजीच्या काही सुचनांवरून मतभेद झाले आणि खाननं फ्लॉवर यांच्या गळ्यावर चाकू धरला. मिकी ऑर्थर यांच्या मधस्तीमुळे हा वाद मिटला. ''युनिस खानला शिकवणं फार अवघड होतं. तो एक चांगला खेळाडू होता. पण, त्याच्यासोबतचा एक प्रसंग माझ्या चांगलाच लक्षात आहे. ब्रिस्बन कसोटीतील तो प्रसंग आहे. ब्रेकफास्ट करताना मी त्याला काही फलंदाजीच्या सूचना करत होतो. माझ्या कारकिर्दीतील धावा या त्याच्या धावांच्या आसपासही नव्हत्या. पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी तो एक होता,'' असे फ्लॉवर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,''त्यामुळेच कदाचित मी दिलेला सल्ला त्याला आवडला नाही आणि त्यानं माझ्या गळ्यावर चाकू धरला. ऑर्थर माझ्या बाजूला बसले होते आणि त्यांनी मध्यस्ती केली. हो हे मजेशीर वाटेल, पण माझ्या प्रशिक्षण काळातील हा एक प्रसंग आहे. मी तो काळ एंजॉय केला. मला अजूनही बरंच काही शिकायचे आहे, परंतु आता ज्या पोझिशनवर आहे, त्याने मी खूश आहे.''
ब्रिस्बन कसोटीतील पहिल्या डावात खान शून्यावर बाद झाला आणि दुसऱ्या डावात 65 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट त्यानं सिडनीत 175 धावा करून केला. संघातील अशाच एका मजेशीर व्यक्तीबद्दल फ्लॉवर यांनी सांगितले. ते म्हणाले,''अहमद शेहजाद हा कुशल फलंदाज आहे, परंतु त्याचा स्वभाव बंडखोर आहे. प्रत्येक संघात असा एक खेळाडू असतोच. पण, काहीवेळा तसा स्वभाव तुम्हाला चांगला खेळाडू बनवतो, तर काहीवेळा नाही.''
न्यूड फोटो शेअर करणाऱ्या महिला खेळाडूवर कारवाई; म्हणाली, स्वातंत्र्यावर घाला!
Video : ... म्हणून अजिंक्य रहाणेनं मानले सरकारचे आभार, शेतकऱ्यांबद्दल काढले गौरवौद्गार
मानलं तुम्हाला; रितेश देशमुख आणि जेनेलियाचा अवयवदानाचा संकल्प!
कोरोनामुक्त होताच शाहिद आफ्रिदी काश्मीर मुद्द्यावर बरळला; केलं मोठं विधान
Cricket is Back: जेम्स अँडरसननं घेतली विकेट अन् खेळाडूंचं सोशल डिस्टन्सिंग सेलिब्रेशन