नवी दिल्ली : आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार शनिवारपासून रंगणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेतील प्रबळ दावेदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान रविवारी 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) रूपात भारताला तर शाहिन आफ्रिदीच्या रूपात पाकिस्तानला झटका बसला आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत पाकिस्तानच्या संघाला अधिक फायदा मिळेल असे पाकिस्तानच्या संघाचा माजी कर्णधार युनूस खानने (Younis Khan) म्हटले आहे.
युनूस खानने म्हटले, "मला वाटते की बुमराह आशिया चषकात खेळत नसल्यामुळे पाकिस्तानच्या संघाला त्याचा अधिक फायदा होईल. भारतीय संघाला आपल्या मॅच विनर खेळाडूची कमी जाणवत राहील. पाकिस्तानी संघाची सलामी जोडी आणि मधली फळी मजबूत असल्यामुळे याचा संघाला फायदा होईल आणि विजय देखील मिळेल", असे त्याने टेलिग्राफशी संवाद साधताना सांगितले. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान रविवारी आमनेसामने असणार आहेत. या बहुचर्चित सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.
Web Title: Younis Khan said Jasprit Bumrah not playing in Asia Cup will benefit Pakistan team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.