IPL 2023 Why RCB not won single trophy ? इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४ पैकी ३ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर संघ विजय मिळवत असताना RCB ला काल बंगळुरूत लखनौ सुपर जायंट्सकडून हार पत्करावी लागली. १८२ धावांचे लक्ष्य त्यांच्यासाठी फार अवघड नव्हते, परंतु त्यांची २८ धावांनी हार झाली. RCB चा संपूर्ण संघ १५३ धावांत तंबूत परतला. खालच्या क्रमांकावर आलेला महिपाल लोमरोर याने १३ चेंडूंत ३३ धावांची स्फोटक खेळी करून LSG चं टेंशन वाढवले होते, परंतु RCB चे अन्य फलंदाज अपयशी ठरले.
फॅफ ड्यू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल व कॅमेरून ग्रीन हे स्टार खेळाडू स्वस्तात परतले. मात्र, अनुज रावत, लोमरोर व अन्य फलंदाजांनी चांगला खेळ केला. RCB च्या पराभवानंतर ६ आयपीएल जेतेपद जिंकणाऱ्या अंबाती रायुडूने ( Ambati Rayudu ) जोरदार टीका केली. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात तो म्हणाला,''त्यांच्याकडे पाहा, दडपणात कोण फलंदाजी करतो? युवा खेळाडू आणि दिनेश कार्तिक.''
अनुज रावतने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत दमदार खेळ केला आणि कालही त्याने ११ चेंडूंत २१ धावा केल्या, तेही मयांक यादवच्या वेगवान माऱ्यासमोर... ''तुमच्या संघातील मोठे खेळाडू, ज्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे, त्यांनी दपडणाच्या परिस्थितीत खेळायला हवं, ते कुठे आहेत? संघावर दडपण असतं तेव्हा हे सर्व ड्रेसिंग रुममध्ये असतात. १६ वर्षांपासून हेच घडत आहे आणि त्यांच्या जेतेपद न जिंकण्याचे हेच प्रमुख कारण आहे,''असे रायुडू म्हणाला.
३८ वर्षीय रायुडू पुढे म्हणाला, ''हिच त्यांची स्टोरी आहे. जेव्हा संघ दडपणाच्या स्थितीत असतो, तेव्हा त्यांचा एकही सीनियर खेळाडू दिसत नाही. खालच्या क्रमांकावर सर्व युवा खेळाडू खेळताना दिसतात. मोठं नाव असलेले खेळाडू आघाडीला फलंदाजीला येतात आणि जातात... ते केकची क्रिम खातात. असा संघ कधीच जिंकू शकत नाही. हेच मुख्य कारण आहे, की ते आयपीएल एकदाही जिंकलेले नाही.''
Web Title: Your big-name players who are international players who are supposed to take pressure where are they?, Ambati Rayudu lashes RCB stars
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.