MS Dhoni: "तुझा डेब्यू माझ्यापेक्षा खूप चांगला होता", शुबमन गिलने सांगितला धोनीचा प्रेरणादायी किस्सा 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या खूप चर्तेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 02:21 PM2022-11-20T14:21:21+5:302022-11-20T14:21:57+5:30

whatsapp join usJoin us
Your Debut Was Better Than Mine Shubman Gill Shares MS Dhoni Inspirational Story, Watch Video | MS Dhoni: "तुझा डेब्यू माझ्यापेक्षा खूप चांगला होता", शुबमन गिलने सांगितला धोनीचा प्रेरणादायी किस्सा 

MS Dhoni: "तुझा डेब्यू माझ्यापेक्षा खूप चांगला होता", शुबमन गिलने सांगितला धोनीचा प्रेरणादायी किस्सा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या खूप चर्तेत आहे. धोनीने त्याच्या कारकिर्दीत अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. खरं तर माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण असे असतानाही तो कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येतो. आता भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिलने माहीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीने चाहत्यांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळत आहे.

शुबमन गिलने २०१९ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले परंतु त्या सामन्यात तो २१ चेंडूत केवळ ९ धावा करून बाद झाला. हॅमिल्टनमध्ये झालेल्या या सामन्यात भारताचा आठ गडी राखून दारूण पराभव झाला. यानंतर शुबमन गिल खूप हताश झाला होता मात्र त्यानंतर अनुभवी कॅप्टन कूल धोनीने त्याला धीर दिला आणि गिलच्या चेहऱ्यावरचे हसू परत आले. 

"तुझा डेब्यू माझ्यापेक्षा खूप चांगला होता"
या घटनेचा खुलासा शुबमनने तीन वर्षांनंतर केला आहे. 'दिल दिया गल्ला' या शोमध्ये बोलताना गिलने म्हटले, "ज्या दिवशी मी पदार्पण केले, तेव्हा मी १५ धावांवर बाद झालो आणि आमचा संघ ९० धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान, माही भाई आला आणि त्याने पाहिले की मी खूप दुःखी आहे. तेव्हा मी १८-१९ वर्षांचा होतो. माही भाईने मला सांगितले की तुझे पदार्पण माझ्यापेक्षा चांगले होते. पदार्पणाच्या सामन्यात धोनी गोल्डन डकवर बाद झाला होता. त्याला एकाही चेंडूचा सामना करावा लागला नाही आणि तो धावबाद झाला. मग तो हसायला लागला आणि तो किस्सा सांगून त्याच्या हावभावाने मला खूप प्रभावित केले."

शुबमन गिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गिल सध्या भारतीय संघासोबत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. शुक्रवारचा पहिला टी-२० सामना पावसाच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. तर मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. 

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी टी-२० संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघ -
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

भारत विरूद्ध न्यूझीलंड वेळापत्रक 
१८ नोव्हेंबर - पहिला टी-२० सामना, स्काय स्टेडियम, वेलिंग्टन, दुपारी १२ वाजल्यापासून 
२० नोव्हेंबर - दुसरा टी-२० सामना, माउंट मौनगानुई, दुपारी १२ वाजल्यापासून 
२२ नोव्हेंबर - तिसरा टी-२० सामना, मॅक्लीन पार्क, नेपियर, दुपारी १२ वाजल्यापासून 
२५ नोव्हेंबर - पहिला एकदिवसीय सामना, ईडन पार्क, ऑकलंड, सकाळी ७.३० वाजल्यापासून 
२७ नोव्हेंबर - दुसरा एकदिवसीय सामना, सेडन पार्क, हॅमिल्टन, सकाळी ७.३० वाजल्यापासून 
३० नोव्हेंबर - तिसरा एकदिवसीय सामना, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च, सकाळी ७.३० वाजल्यापासून 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 


 

Web Title: Your Debut Was Better Than Mine Shubman Gill Shares MS Dhoni Inspirational Story, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.