नवी दिल्ली - फिटनेस इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध क्षेत्रातील काही व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी मोदींनी विराट कोहलीसोबत बोलताना त्याचा कर्तृ्त्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनी पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चासत्रात विराट कोहली सहभागी झाला होता.
विराटचं कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, तुझं नाव आणि काम दोन्ही विराट आहेत. त्यानंतर मोदींशी संवाद साधताना विराट कोहली म्हणाला की, आम्ही ज्या काळात खेळायला सुरुवात केली त्या काळात खेळाची आवश्यकता बदलली होती. आपल्याकडील व्यवस्था खेळासाठी योग्य नव्हती आणि खेळासाठी मला खूप काही बदलावे लागले.
जर सराव चुकला तर वाईट वाटत नाही. मात्र फिटनेसवर मी लक्ष ठेवतो, असे विराटने सांगितले. त्यावर तुझ्या फिटनेसमुळे दिल्लीमधील छोले-भटुऱ्यांचे खूप नुकसान झाले असेल,असा विनोद मोदींनी केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फिट इंडिया मोहिमेचा भाग बनल्यामुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे, असे ट्विट विराट कोहलीने केले होते.
फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून देशभरातील निवडक व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चासत्रात भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, दोन वेळचा पॅरालिम्पिकमधील विजेता देवेंद्र झाझरिया, अभिनेता मिलिंद सोमण आदींनी पंतप्रधानांशी संवाद साधला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता
आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी
Web Title: Your name and work are both Virat, Prime Minister Modi showered compliments on Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.