Join us  

"वेलडन अजिंक्य, तमाम महाराष्ट्राला आपला अभिमान"; उर्मिला मातोंडकर यांच्याकडून कौतूक

India won 2nd test in Australia, Urmila Matondkar : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. विराट कोहली, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रोहित शर्मा यांच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) ज्या कौशल्यानं नेतृत्व केलं, त्याचं सारेच कौतुक करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 2:48 PM

Open in App

पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघाने मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने ज्या  ( Ajinkya Rahane) ज्या कौशल्यानं नेतृत्व करत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली ते पाहून अजिंक्यचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली.टीम इंडियाच्या विजयानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांनींही आनंद व्यक्त केला. आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही रहाणेसह टीम इंडियाचे कौतूक केले आहे. 

“वेल डन अजिंक्य. तमाम महाराष्ट्राला आणि पुर्ण देशाला आपला खुपखुप अभिमान आहे. टीम इंडियाचं अभिनंदन”, या आशयाचं ट्विट उर्मिला यांनी केले आहे.

शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही भारतीय संघाचे कौतूक केले आहे. 

भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. विराट कोहली, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रोहित शर्मा यांच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) ज्या कौशल्यानं नेतृत्व केलं, त्याचं सारेच कौतुक करत आहेत. त्यात उमेश यादवही जायबंदी झाल्यानं कोणताही कर्णधार डगमगला असता, परंतु अजिंक्यच्या संयमी व शांत स्वभावानं त्याला कणखर ठेवले. पदार्पणवीर मोहम्मद सिराजला प्रोत्साहन देत राहत अजिंक्यनं त्याच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. सिराजनं दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेत ऑसींना धक्के दिले. ऑस्ट्रेलियाचे ७० धावांचे लक्ष्य टीम इंडियानं २ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

टीम इंडियाच्या विजयानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांनींही आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विट केलं की, ''भारताना दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं... सेटबॅकचं उत्तर कमबॅकनं देणार, मी बोललो होतो... दिलं, तेही त्यांच्या घरी घुसून. अभिनंदन टीम इंडिया.''    

७० धावांच्या प्रत्युत्तरात मयांक अग्रवाल ( ५) व चेतेश्वर पुजारा ( ३) झटपट माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व अजिंक्य रहाणेनं संघाला विजय मिळवून दिला. अजिंक्यनं विजयी धाव घेतली. गिल ३५ धावांवर, तर अजिंक्य २७ धावांवर नाबाद राहिला. या विजयानंतर भारतीय संघाचे सर्वांनी कौतुक केलं. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. तेंडुलकर म्हणाला,''विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी  यांच्याशिवाय विजय मिळवला, म्हणजे हे खूप मोठं यश आहे. ०-१ अशा पिछाडीनंतर टीम इंडियानं दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे कौतुक.''

टॅग्स :अजिंक्य रहाणेउर्मिला मातोंडकरभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशिवसेना