Join us  

तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची ( Sanju Samson ) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 9:45 PM

Open in App

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची ( Sanju Samson ) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आहे. २०१५ साली भारताकडून पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनचा हा पहिलाच वर्ल्ड कप असणार आहे. आयपीएल २०२४ मधील त्याची कामगिरी पाहून निवड समितीने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. सॅमसनने गेल्या डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कारकिर्दीतील पहिले वन डे शतक झळकावले होते. रिषभ पंत दुखापतीमुळे बाहेर होता आणि निवड समितीने इशान किशनकडे दुर्लक्ष करून संजूवर विश्वास दाखवला आहे. 

सॅमसनच्या कारकिर्दीसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खूप महत्त्वाचा असणार आहे. यानंतर, सॅमसनची कारकीर्द एकतर यशस्वी होईल किंवा तो पुन्हा टीम इंडियामध्ये परत येणार नाही. त्यामुळेच टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) २९ वर्षीय खेळाडूला इशारा दिला आहे. गंभीरने स्पष्टपणे सांगितले की, सॅमसनकडे खूप अनुभव आहे आणि त्याला इतरांसमोर स्वतःला सिद्ध करावे लागेल.

स्पोर्ट्सकीडाशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की,आता टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात तुझी निवड झाली आहे. आता तुला संघासाठी सामने जिंकावे लागतील. तुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. तू नवीन खेळाडू नाही की तुला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. तू आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चव चाखली आहे. आयपीएलमध्येही तू चांगली कामगिरी केली आहेस.  तुझ्यात किती ताकद आहे हे तुला दाखवावे लागेल. संपूर्ण जग तुला पाहतोय... 

संजू सॅमसन आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने १३ सामन्यांत ५०४ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या तो ऑरेंज कॅपच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024संजू सॅमसनगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघ