युवा हॉकीपटूंसाठी ‘टॉनिक’सारखा ठरला युरोप दौरा

मागच्या वर्षी ज्युनियर विश्वचषकाचे जेतेपद पटकवित इरादे जाहीर करणाºया भारतीय हॉकीतील युवा ब्रिगेडसाठी सिनियर स्तरावरील पदार्पण स्वप्नवत ठरले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:57 AM2017-08-19T00:57:18+5:302017-08-19T00:57:21+5:30

whatsapp join usJoin us
Youth hockey players like 'tonic' to tour Europe | युवा हॉकीपटूंसाठी ‘टॉनिक’सारखा ठरला युरोप दौरा

युवा हॉकीपटूंसाठी ‘टॉनिक’सारखा ठरला युरोप दौरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : मागच्या वर्षी ज्युनियर विश्वचषकाचे जेतेपद पटकवित इरादे जाहीर करणाºया भारतीय हॉकीतील युवा ब्रिगेडसाठी सिनियर स्तरावरील पदार्पण स्वप्नवत ठरले. नुकत्याच संपलेल्या युरोप दौºयात दिग्गजांना नमविल्यानंतर युवा खेळाडू कुठल्याही संघाविरुद्ध ‘दोन हात’ करण्यास सज्ज आहेत.
युरोप दौºयात सहा युवा खेळाडू प्रथमच सिनियर स्तरावर खेळले. पहिल्या दोन सामन्यात बेल्जियमकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर चौथ्या स्थानावरील नेदरलँडला सलग दोन सामन्यात या संघाने पराभूत केले. अखेरच्या सामन्यात आॅस्ट्रियाला देखील धूळ चारली. या दौºयात नियमित फॉरवर्ड एस. व्ही. सुनील, आकाशदीप, अनुभवी मिडफिल्डर सरदारसिंग आणि गोलकिपर- कर्णधार पी. आर. श्रीजेश नव्हते. अशावेळी गुरजंतसिंग, अरमान कुरेशी, मिडफिल्डर नीलकांता शर्मा, बचावफळीत वरुण कुमार आणि दिप्सन तिर्की, गोलकिपर सूरज करकेरा यांना स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी होती. सर्वजण या कसोटीवर यशस्वी ठरले.
सूरजचा अपवाद वगळता सर्वच खेळाडू लखनौ येथे झालेल्या २०१६ च्या ज्युनियर विश्वचषकात भारताकडून खेळले. युरोप दौरा सर्वांसाठी अविस्मरणीय
तर ठरलाच पण सिनियर स्तरावर खेळण्याचे दडपण झुगारण्यासाठी देखील ‘मैलाचा दगड’ ठरला आहे.
अरमान म्हणाला,‘ज्युनियर स्तरावर सर्वजण एकत्र खेळल्याने ताळमेळ चांगला होता. मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम होण्याचे तंत्र या दौºयात मिळाले. विजयांमुळे आत्मविश्वासही उंचावला.’ नेदरलँडवर साजरा केलेला विजय सर्वजण आयुष्यभर विसरणार नाहीत. क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या संघाला आमचा युवा संघ पराभूत करेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. हे विजय टॉनिकसारखे असल्याची भावना वरुण कुमारने व्यक्त केली.
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो याला आदर्श मानणारा मुंबईचा गोलकिपर सूरज करकेरा म्हणाला, ‘या दौºयात मला दडपण कसे झुगारायचे हे शिकता आले. मोठ्या संघांविरुद्ध कसे खेळायचे. दडपण कसे झुगारायचे हे शिकायला मिळाले. माझ्या करियरमध्ये हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल.’(वृत्तसंस्था)
सुंदरगडहून आलेला दिप्सेन म्हणाला,‘मी जून २०१३ पासून ज्युनियर भारतीय संघात आहे. युरोप दौºयात सिनियर स्तरावर खेळलो तरी उच्चस्तर कामगिरीसाठी आणखी परिपक्व व्हावे लागेल. लहान-लहान चुकांवर मात करणे शिकावे लागणार आहे.
मणिपूरचे प्रतिनिधित्व करणारा नीलकांता शर्मा म्हणाला,‘ज्युनियर खेळाडूंना मोठ्या स्तरावर काही करून दाखविण्याची इच्छा होती. या दौºयात ती पूर्ण झाली. आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करायचीच या निर्धारासह खेळलो.
राष्टÑकुल, आशियाड आणि विश्वचषक हॉकीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी आता संधी असेल. या यशाचे श्रेय शर्माने ज्युनियर विश्वचषक विजेत्या संघाचे कोच हरेंद्रसिंग यांना दिले. हरेंद्र सरांनी आम्हाला बेसिक्स सुधारायला सांगितले. आम्ही तेच केले. यशचे सर्व श्रेय हरेंद्र यांना द्यायला हवे,’ असे तो म्हणाला.

Web Title: Youth hockey players like 'tonic' to tour Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.