कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी अनेक खेळाडू स्वतःहून पुढे येत मदत करत आहेत. अनेकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत केली आहे. पण, इरफान आणि यूसून पठाण यांनी समाजकार्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी पठाण बंधूंनी 10 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
Video : अजिंक्य रहाणेकडून तुळजापूरच्या शेतकऱ्याचं कौतुक, तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट
जगभरात कोरोनाचे 12 लाख 74, 543 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 69, 487 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांचा आकडा हा 4314 वर पोहोचला असून आतापर्यंत 118 जणांचा मृत्यू झाला आहे. 328 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे. अशा वेळी गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीला सामाजिक संस्था पुढ्या आल्या आहेत. हरभजन सिंगनेही 5000 कुटुंबांना रेशन पुरवण्याचा निर्धार केला आहे. पठाण बंधुंनीही पुढाकार घेतला आहे.
युसूफ व इरफान यांनी एका वेबसाईटला सांगितले की,''या गंभीर परिस्थितीत सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील काही दिवस आणखी आव्हानात्मक असणार आहेत आणि आम्ही लोकांना घरीच राहण्याचं आवाहन कतो.''
याआधी, कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. गौतम गंभीरनं त्याच्या खासदार निधीतून 1 कोटींची मदत आणि दोन वर्षांचा पगार दान केला. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत. युवराज सिंगनेही 50 लाख दान केले आहेत.
अन्य महत्त्वाचा बातम्या
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!
आफ्रिदीच्या मदतीसाठी आवाहन करणाऱ्या युवराज सिंगचं लाखोंचं दान
हरभजन सिंग अन् त्याच्या पत्नीची समाजसेवा; 5000 कुटुंबांना पुरवणार रेशन