Yusuf Pathan, Legends League Cricket 2024: निवृत्त क्रिकेटपटूंची स्पर्धा अशी ओळख असलेल्या क्रिकेट स्पर्धेत दररोज नवनवे कारनामे होत आहेत. नुकत्याच झालेल्या कोणार्क सूर्यास विरुद्ध सदर्न सुपरस्टार्स या सामन्यात तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना कोणार्क संघाने सलामीवीर रिचर्ड लेव्ही याच्या अर्धशतकाच्या जोरावर 192 धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान मोठे वाटत असले तरी मार्टिन गप्टिलने झंजावाती शतक ठोकत सुपरस्टार्स संघाला दिमाखात विजय मिळवून दिला. या सामन्यात युसुफ पठाण याने छोटेखानी ३३ धावांची खेळी केली. त्याने एकाच षटकात मारलेले तीन उत्तुंग षटकार भाव खाऊन गेले.
प्रथम फलंदाजी करताना कोणार्क संघाचा सलामीवीर रिचर्ड लेव्ही याने ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २१ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. पहिले ४ फलंदाज झटपट बाद झाल्यावर युसुफ पठाणने आपली हिसका दाखवला. त्याने स्पिनरच्या एकच षटकात तीन उत्तुंग षटकार खेचले. पठाणला चांगली सुरुवात मिळाली होती. २२ चेंडूत त्याने २ चौकार आणि ३ षटकार खेचत ३३ धावा केल्या. पाहा पठाणने लगावलेले षटकार:-
दरम्यान, या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोणार्क संघाने षटकात नऊ बाद १९२ धावा केल्या. प्रत्युत्तर दाखल सुपरस्टार संघाकडून मार्टिन गपटिलने तब्बल ११ षटकार खेचत १३१ धावांची खेळी केली. अवघ्या ५४ चेंडूत त्याने हा पराक्रम केला. त्याच्या डावात ९ चौकरांचा देखील समावेश होता.