युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी केले संघातील स्थान पक्के

न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने ४-१ ने जिंकली. विजयातील हे अंतर फार महत्त्वाचे आहे; कारण आतापर्यंत ‘किवीज’ची घरच्या मैदानावरील कामगिरी ही सर्वाेत्तम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:55 AM2019-02-05T05:55:53+5:302019-02-05T06:00:13+5:30

whatsapp join usJoin us
Yuviwendra Chahal, Kuldeep Yadav made the team's place | युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी केले संघातील स्थान पक्के

युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी केले संघातील स्थान पक्के

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)

न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने ४-१ ने जिंकली. विजयातील हे अंतर फार महत्त्वाचे आहे; कारण आतापर्यंत ‘किवीज’ची घरच्या मैदानावरील कामगिरी ही सर्वाेत्तम आहे. भारतासाठी यशस्वी ठरलेल्या या मालिकेत संघाची कामगिरी कशी ठरली यावर टाकलेली ही एक नजर...

विराट कोहली ८/१०

मालिकेत तीन सामन्यांत फलंदाजी केली; मात्र शतक झळकावू शकला नाही. हे तिन्ही सामने भारताने जिंकले ही एक जमेची बाजू राहिली. त्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेले हे सामने महत्त्वपूर्ण ठरले.

कुलदीप /युजवेंद्र ८.५/१०

ही जोडी सध्याच्या घडीला फिरकीचे बादशहा ठरत आहेत. ‘कुलचा’ या जोडीने मिळून १७ बळी घेतले. यातील बहुतांश बळी हे मोक्याच्या वेळी घेतले. या जोडीने विश्वचषकाच्या संघात आपले स्थान पक्के केले .

हार्दिक पांड्या ८/१०

निलंबनानंतर यशस्वी पुनरागमन. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वच प्रकारांत उत्कृष्ट खेळ करून त्याने पुन्हा सिद्ध केले की तो सध्याच्या घडीला नं. १ अष्टपैलू खेळाडू आहे.

एम. एस. धोनी ६.५/१०

फलंदाज म्हणून संमिश्र मालिका. ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयश. यष्टीमागे जबरदस्त प्रदर्शन. गोलंदाजांनाही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

केदार जाधव ७/१०

अधिक धावा करता आल्या नाहीत; पण काही वेळा दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले. न्यूझीलंडच्या दिग्गज फलंदाजांना बाद करून उत्तम भूमिका.

दिनेश कार्तिक ६/१०

दोन सामने खेळला. एका सामन्यात उत्तम योगदान दिले. त्याचा फॉर्म आणि अनुभव संघासाठी उपयुक्त ठरला. मात्र, विश्वचषकात स्थान मिळविण्यासाठी तो दबावातही दिसला.

विजय शंकर ५/१०

शिस्तप्रिय खेळाडू. अखेरच्या सामन्यात संघाला वाचविण्यात भूमिका. कमी संधी मिळाल्यामुळे आपल्यातील अष्टपैलूत्व सिद्ध करूशकला नाही.

रोहित शर्मा ६.५/१०

साजेसा खेळ करण्यात यशस्वी. चौथा सामना गमाविल्यानंतर दबाव वाढला होता. मात्र, कुशाग्र निर्णय घेत उत्तम नेतृत्व करीत अखेरचा सामना जिंकून दिला.

मोहम्मद शमी ८.५/१०

भारताचा सर्वांत प्रभावशाली गोलंदाज. वेग, स्विंग आणि अचूकतेच्या जोरावर फलंदाजांना जेरीस आणण्यात यशस्वी. नऊ बळी घेतले. सुरुवातीच्या स्पेलमध्ये कमी धावगती राखण्यात सातत्याने यशस्वी. विश्वचषकाच्या संघात आपले स्थान जवळजवळ पक्के केले आहे.

शुभमन गिल ३/१०

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्यामुळे अपेक्षा वाढविल्या. अपेक्षेपर्यंत पोहोचू शकला नाही; पण अनुभवातून त्याकडे वाटचाल करणार हे दाखवून दिले.

खलील अहमद २/१०

एकाच सामन्यात संधी मिळाली; पण बळी मिळविण्यात अपयशी ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करण्याची गरज आहे.

शिखर ७/१०

अत्यंत सहज खेळला. लय मिळविण्यात यश. विश्वचषकातील आपल्या स्थानाबद्दल अधिक दावेदारी सिद्ध केली.

भुवनेश्वर ७.५/१०

नवा चेंडू असो किंवा अंतिम षटके, आपली छाप सोडणारा गोलंदाज. लेट स्विंगमुळे तो इंग्लंडमध्ये यशस्वी ठरू शकतो.


 

Web Title: Yuviwendra Chahal, Kuldeep Yadav made the team's place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.