Join us  

युवराजला डच्चू नाही त्याला आराम दिलाय: चीफ सिलेक्टर

श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये युवराज सिंगचं नाव नसल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 6:33 PM

Open in App
ठळक मुद्देयुवराज सिंगला मालिकेतून वगळण्यात आलेलं नाही तर त्याला विश्रांती देण्यात आली आहेआम्ही एक नवी निती सुरू केली आहे. यानुसार पुढील 4 ते 5 महिन्यांत काही नव्या खेळाडूंना संधी देणार आहोतयुवराज व्यतिरिक्त सुरेश रैना साठीही संघाचे दरवाजे बंद झालेले नाहीत असंही प्रसाद म्हणाले.

मुंबई, दि. 14 -  श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये युवराज सिंगचं नाव नसल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र,युवराज सिंगला मालिकेतून वगळण्यात आलेलं नाही तर त्याला विश्रांती देण्यात आली आहे, असं निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटलं आहे. स्पोर्ट्सकिडाने दिलेल्या वृत्तानुसार, आम्ही एक नवी निती सुरू केली आहे. यानुसार पुढील 4 ते 5 महिन्यांत काही नव्या खेळाडूंना संधी देणार आहोत. 2019 च्या विश्वचषकाचा विचार करून रोटेशन पॉलिसीवर आम्ही काम करत आहोत. युवराज व्यतिरिक्त सुरेश रैना साठीही संघाचे दरवाजे बंद झालेले नाहीत असं प्रसाद म्हणाले. आम्ही फिटनेसला प्राधान्य देणार आहोत, ज्या खेळाडूची फिटनेस उच्चदर्जाची नसेल त्याला संधी मिळणार नाही. इतर खेळाडूंना आजमावून पाहाता यावं यासाठी युवराज सिंगला मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे पण वगळण्यात आलेलं नाही असं प्रसाद म्हणाले.  खराब फार्ममध्ये असल्याने युवराज सिंगला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला असल्याची चर्चा होती. श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  या मालिकेसाठी रोहित शर्माकडे उपकर्णधारपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. याशिवाय पालघरच्या शार्दूल ठाकूरचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे जूनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपासून दूर राहिलेला के. एल. राहुल याचे पुनरागमन झाले आहे. हा 25 वर्षीय फलंदाज जानेवारीनंतर एकही वनडे खेळलेला नाही. या मालिकेसाठी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसंच युवराज सिंगला या संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.कसोटी मालिका संपल्यानंतर 20 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. 15 सदस्यीस संघात फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे, तर जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकुर यांच्यावर जलदगती गोलंदाजीची धुरा असणार आहे. श्रीलंकेमध्ये भारत 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. 20 ऑगस्ट रोजी डम्बुल्ला येथे पहिला वन डे सामना होणार आहे. श्रीलंका दौ-यासाठी भारतीय संघ-  विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एम एस धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर