Join us

"मी डेंग्यू आणि कॅन्सर असूनही वर्ल्ड कप खेळलोय...", PAK विरूद्धच्या सामन्यापूर्वी 'युवी'चा गिलला सल्ला

वन डे विश्वचषकात शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 13:55 IST

Open in App

अवघं विश्व ज्या क्षणाची वाट पाहत होतं तो क्षण केवळ काही तास दूर आहे. कारण वन डे विश्वचषकात शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघ प्रत्येकी २-२ सामने जिंकून इथपर्यंत पोहचले आहेत. यजमान भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला, तर पाकिस्तानने नेदरलॅंड्स आणि श्रीलंकेला पराभूत करून यजमानांशी भिडण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. खरं तर वन डे विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला कधीच भारताविरूद्ध विजय मिळवला आलेला नाही. त्यामुळे टीम इंडिया देखील शेजाऱ्यांविरूद्धचा विजयरथ कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. पण, स्पर्धेच्या सुरूवातीलाच भारतीय संघाला शुबमन गिलच्या रूपात मोठा झटका बसला. 

दरम्यान, डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त असलेला गिल पहिल्या दोन सामन्याला मुकला. त्यामुळे उद्याच्या सामन्यात तरी तो खेळणार का याबाबत संभ्रम आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार असून यासाठी गिल सामन्याच्या ठिकाणी पोहचला आहे. अशातच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने युवा खेळाडूला एक मोलाचा सल्ला दिला आहे. 

'युवी'चा गिलला सल्ला आजाराने ग्रस्त असलेल्या गिलला सल्ला देताना युवीने म्हटले, "मी शुबमन गिलला मजबूत बनवले असून त्याच्याशी चर्चा केली आहे. मी त्याला सांगितले की, मी डेंग्यू आणि कॅन्सर असताना देखील विश्वचषकातील सामने खेळले आहेत. त्यामुळे आशा आहे की तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी पूर्णपणे बरा होईल. तसेच मोठ्या सामन्यात भारतीय संघाचा भाग असेलच." युवी ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होता. 

वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

वन डे विश्वचषकातील भारताचे पुढील सामने - भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानडेंग्यूयुवराज सिंगशुभमन गिल