असे आहेत युवराज सिंगचे जगातील 'Best Playing 11'; पण या स्टार भारतीय क्रिकेटरला वगळून सर्वांनाच चकित केलं!

टीव्ही अँकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शेफाली बग्गासोबतच्या एका मुलाखतीत युवराज सिंगने आपले ऑल टाइम बेस्ट Playing 11 निवडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 04:22 PM2024-07-14T16:22:38+5:302024-07-14T16:23:58+5:30

whatsapp join usJoin us
yuvraj singh all time best playing 11 in the world sachin tendulkar rohit sharma virat kohli | असे आहेत युवराज सिंगचे जगातील 'Best Playing 11'; पण या स्टार भारतीय क्रिकेटरला वगळून सर्वांनाच चकित केलं!

असे आहेत युवराज सिंगचे जगातील 'Best Playing 11'; पण या स्टार भारतीय क्रिकेटरला वगळून सर्वांनाच चकित केलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताला 2-2 विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका असलेला माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंगने जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करत आपले ऑल टाइम बेस्ट प्लेइंग इलेव्हन (Playing 11) तयार केली आहे. युवराज सिंगने या प्लेईंग इलेव्हनमध्ये आपल्या काळातील आणि सध्याच्या काही खेळाडूंची निवड केली आहे. मात्र, युवीने या ऑल टाइम ग्रेट क्रिकेटर्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महेंद्रसिंह धोनीला स्थान न देऊन सर्वांनाच चकित केले आहे.

युवराज सिंगनं निवडले जगातील सर्वश्रेष्ठ Playing 11 -
टीव्ही अँकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शेफाली बग्गासोबतच्या एका मुलाखतीत युवराज सिंगने आपले ऑल टाइम बेस्ट Playing 11 निवडले आहेत. युवराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. युवराजने सचिन तेंडुलकरला ओपनर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली आहे आणि त्याचा जोडिदार म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंगची संघात स्थान दिले आहे. यानंतर, रोहित शर्माला तिसऱ्या स्थानावर तर विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे.


एबी डिव्हिलियर्सलाही संधी -  
युवराज सिंगने क्रमांक 5 वर फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सची निवड केली आहे. तर सहाव्या क्रमांकावर आणि विकेटकीपर म्हणून अॅडम गिलख्रिस्टला घेतले आहे.

ऑलराउंडर म्हणून यांना मिळाली संधी -
युवराजने 7 व्या क्रमांकासाटी ऑलराउंडरच्या रुपात इंग्लंडचा माजी क्रिकेटर अँड्रयू फ्लिंटॉफची निवड केली आहे. महत्वाचे म्हणजे, युवराज सिंग आणि अँड्रयू फ्लिंटॉफ यांच्यात 36 चा आकडा होता.

स्पिनर म्हणून यांना संधी -
युवराजने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महान स्पिनर मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्नची निवड केली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून वसीम अक्रम आणि ग्लेन मॅक्ग्राची निवड केली आहे. तर स्वतःची १२ खेळाडू म्हणून निवड केली आहे.

 

Web Title: yuvraj singh all time best playing 11 in the world sachin tendulkar rohit sharma virat kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.