युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी यांची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली गेली आहे. भारत-पाकिस्तान ( IND vs PAK) लढत पाहण्यासाठी हे दोघंही न्यूयॉर्कच्या नासाऊ कौंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उपस्थित होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ६ धावांनी हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताला ११९ धावाच करता आल्या. पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती आणि १४ षटकांत ३ बाद ८० धावा, अशा सुस्थितीत ते होते. पण, जसप्रीत बुमराहने अविश्वसनीय गोलंदाजी करून पाकिस्तानला ११३ धावांवर रोखले.
धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवानने एका बाजूने पाकिस्तानसाठी खिंड लढवण्याचं काम केलं होतं. पाकिस्तानला ३६ चेंडूंत ४० धावांची गरज असताना जसप्रीत पुन्हा गोलंदाजीला आला. त्याने रिझवान व इफ्तिखर अहमद यांना माघारी पाठवले आणि या धक्क्यातून पाकिस्तानला सावरता आले नाही. या सामन्यादरम्यात युवराजने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद याचं सांत्वन करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ १२० धावाही करू शकला नाही, यावर आफ्रिदीला विश्वास बसत नव्हता. सामना सुरू असताना युवराज व शाहिद यांच्यामध्ये नेमकं काय चर्चा रंगली हे या संवादातून समजते आहे.
- युवराज सिंग - लाला, काय झालं, तू दुःखी काय आहेस?
- शाहिद आफ्रिदी - मी दुःखी होणं योग्य आहे की अयोग्य? हा सामना पाकिस्तान हरण्यासारखा होता का? जेव्हा आम्हाला ४० धावा विजयासाठी हव्या होत्या, तेव्हा युवराज तू मला म्हणालेलास, लाला अभिनंदन! मी आता उर्वरित मॅच नाही पाहू शकत, मी चाललो! तेव्हा मी त्याला म्हणाला, युवी, ४० धावा या खेळपट्टीवर भरपूर आहेत. एवढ्या लवकर अभिनंदन करू नकोस.
- युवराज सिंग - मी तुला म्हटले होते पाकिस्तान जिंकतोय, परंतु मला आत्मविश्वास होता की भारत हा सामना जिंकेल. जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. महत्त्वाचं आहे की आमची मैत्री कायम राहिली पाहिजे.
Web Title: Yuvraj Singh and Shahid Afridi revealed their conversation during the T20 World Cup match between India and Pakistan, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.