shubman gill | नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल शानदार फॉर्ममध्ये आहे. गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग असलेला गिल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. काल झालेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी करून मुंबई इंडियन्सला खुशखबर दिली. गतविजेत्या गुजरात टायटन्सने आरसीबीच्या स्वप्नावर पाणी टाकले अन् विराट आर्मीला बाहेरचा रस्ता दाखवला. शुबमन गिलने १०४ धावांची शतकी खेळी करून विराटच्या शतकाचा देखील पराभव केला. खरं तर कालच्या सामन्यात गिल आणि विराट कोहली यांनी शतक झळकावून रंगत आणली. पण गिलचे शतक किंग कोहलीच्या शतकावर भारी पडले अन् मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला.
शुबमन गिलच्या शतकी खेळीमुळेच मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले आहे. कारण आरसीबीच्या पराभवावर मुंबईचे प्लेऑफच्या गणित अवलंबून होते. अशातच शुबमन गिलमुळे प्ले ऑफमध्ये पोहोचलात आता त्याला एक चांगली कार द्या, अशी मागणी भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने एमआयकडे केली आहे. युवीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत ही मागणी केली. गिलने ८ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५२ चेंडूत १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली.
गिलला कार गिफ्ट द्यायला हवी - युवराज सिंग
RCBच्या पराभवामुळे मोठा ट्विस्ट! ऑरेंज कॅप जिंकण्याची 'गिल'ला संधी; पर्पल कॅपसाठी GT मध्येच रस्सीखेच
मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये धडकगुजरातविरूद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 'करा किंवा मरा' असा होता. गतविजेत्यांना पराभूत करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान विराट आर्मीसमोर होते. पण गुजरातने आपला विजयरथ कायम ठेवून आरसीबीला बाहेरचा रस्ता दाखवला अन् मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. आरसीबीने दिलेल्या १९९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने १०४ धावांची नाबाद शतकी खेळी करून गुजरातला विजय मिळवून दिला.
"१५ वर्षे फक्त २ शब्दातच गेली...", RCBचा पराभव अन् इरफान पठाणने चाहत्यांची मांडली भावना