भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं अखेर 'त्या' विधानाबद्दल माफी मागितली. युवीनं काही दिवसांपूर्वी रोहित शर्मासोबत इंस्टाग्रामवर चॅट करताना युजवेंद्र चहलबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता एका दलितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यानं युवीविरोधात पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर युवीनं शुक्रवारी आपली बाजू मांडली. माझ्या विधानानं कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो, असे युवी म्हणाला.
रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीनं चहलला 'भंगी' असं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. कार्यकर्ता आणि वकिल रजत काल्सन यांनी युवी विरोधात हिसार येथील हंसी येथे तक्रार दाखल केली आहे. असे वृत्त झी न्यूजने दिले आहे. युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंड बुधवारी व्हायरल झाला होता.
युवीविरोधात तक्रार दाखल करताना काल्सन यांनी रोहितवरही टीका केली. रोहितनं युवीच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करायला हवी होती, असं त्यांचं म्हणणं आहे. काल्सन यांनी युवीच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांनी युवीच्या त्या वक्तव्याची CD आणि काही कागदपत्र पोलिसांना दिली आहेत. हंसीचे पोलिस अधिकारी लोकेंद्र सिंग यांनी सांगितले की,''याचा तपास सुरू आहे. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. युवी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होईल.''
युवीनं 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानं 304 वन डे, 40 कसोटी आणि 58 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं. युवीनं ट्विट केलं की,''माझा कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास नाही. धर्म, रंग, पंथ किंवा लिंग यावरून मी कधीच भेदभाव करत नाही. लोकांचं कल्याण करण्यासाठी मी झटत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मी आदर राखतो.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोट्यधीश नेयमारचा अवघ्या ९ हजारांच्या सरकारी निधीसाठी अर्ज?... जाणून घ्या सत्य
आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!
Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!
वसीम अक्रमच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला शेवटचं स्थान!
चला निसर्ग जगवूया, मनाची बंद कवाडं उघडूया; रोहित शर्माची भावनिक साद
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सर्वोत्तम वन डे संघातून रोहित शर्माला वगळले!