कोरोना व्हायरसच्या संकटात शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक तंदुरुस्ती राखण्याचं आव्हान सर्वांना पेलावं लागत आहे. लॉकडाऊनमुळे क्रिकेट स्पर्धाच होत नसल्यानं खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांना फिटनेससाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. त्यात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं सोशल मीडियावर #KeepItUp challenge ही मोहीम सुरू केली आहे. त्यानं त्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांना नॉमिनेट केलं आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 45 लाख 27,291 वर पोहोचली आहे. त्यापैकी 17 लाख 05,835 जणं बरी झाली आहेत, परंतु 3 लाख 03,418 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 82,103 वर पोहोचली आहे. 27,977 रुग्ण बरे झाले असले तरी 2649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा या कठीण प्रसंगात स्वतःला शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त ठेवणं प्रत्येकाच्या हातात आहे. त्यासाठी युवीनं एक मोहीम हाती घेतली आहे.
IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत
गुरुवारी युवीनं एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो बॅट आणि चेंडू यांच्यातील ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी त्यानं बॅट आडवी पकडली आहे. त्यांनी आता सचिन, रोहित व भज्जीला चॅलेंज दिलं आहे. पण, त्यानं भज्जीची फिरकी घेतली. तो म्हणाला,''हा टास्क सचिन आणि रोहित यांच्यासाठी सोपा आहे, परंतु भज्जीसाठी अवघडच आहे.''
पाहा व्हिडीओ...