आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून ( Indian Premier League) निवृत्ती घेणारा युवराज सिंग ( Yuvraj Singh) नव्या चॅलेंजसाठी सज्ज झाला आहे. 2019मध्ये निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवी कॅनडात झालेल्या Global T20 Canadaमध्ये खेळला होता आणि परदेशातील लीगमध्ये खेळणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. आता त्यानं आणखी एका लीगवर लक्ष केंद्रीत केलं असून वर्षाअखेरीस तो चाहत्यांना मोठं सप्राईज देण्याच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग ( Big Bash League ) मध्ये खेळण्यासाठी युवी उत्सुक असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी त्यानं चर्चा सुरू केली आहे. 3 डिसेंबर ते 6 फेब्रुवारी या कालावधीत Big Bash League चे 10वे पर्व खेळवले जाणार आहे.
जून 2019मध्ये युवीनं भारतीय क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि Big Bash League मध्ये खेळण्याच्या नियमात तो बसतो. त्यामुळेच त्याला ग्लोबल ट्वेंटी-20 आणि अबु धावी T10 लीगमध्ये खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) ना हरकत प्रमाणपत्रही दिलं होतं. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) युवी खेळणार अशीची चर्चा होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्याला सहभाग घेता आला नाही. (Yuvraj Singh to play Big Bash League?)
''BBLमध्ये Yuvraj Singh ला कोणत्या संघाकडून संधी मिळू शकते, याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा सुरू आहे,''असे युवराजचे मॅनेजर जेसन वॉर्न यांनी सांगितले. सचिन तेंडुलकरला 2013/14च्या BBLमध्ये सिडनी थंडर्सकडून खेळण्याची संधी मिळणार होती, परंतु ही चर्चा राहिली. त्यानं नोव्हेंबर 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (Yuvraj Singh to play Big Bash League?)
Yuvraj Singhला 2017ला राष्ट्रीय संघातून वगळण्यात आले. त्यानंतर पुढील दोन वर्ष तो Indian Premier League मध्ये खेळला. पण, 2018 मध्ये Kings XI Punjab आणि 2019मध्ये Mumbai Indians कडून त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. IPL 2019च्या फायनलनंतर युवीनं दोन महिन्यांत निवृत्ती जाहीर केली. आता युवी BBLमध्ये खेळणार की नाही, हे लवकरच कळेल. (Yuvraj Singh to play Big Bash League?)
युवराज सिंगनं 304 वन डेत 8701 धावा आणि 111 विकेट्स घेतल्या आहेत. त्याशिवाय त्यानं 40 कसोटी व 58 ट्वेंटी-20तही भारताचे प्रतिनिधित्व केलं.
प्रविण तांबेनं रचला इतिहास48 वर्षीय प्रविण तांबेनं (Pravin Tambe ) मागील आठवड्यात Caribbean Premier League (CPL) मध्ये खेळणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान पटकावला. त्यानं त्रिनबागो नाइट रायडर्सकडून पदार्पण केलं. याआधी त्यानं संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या T10लीगमध्ये सहभाग घेतला. ग्लोबल T20 कॅनडा लीगमध्ये मनप्रीत गोनी खेळला होता, तत्पूर्वी वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांनी T10लीगमध्ये खेळले होते.