कॅनडा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंगचीकॅनडा ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमधील सुरुवात फार चांगली झाली नव्हती. पहिल्याच सामन्यात त्याला 27 चेंडूंत केवळ 14 धावा करता आल्या होत्या. पण, सोमवारी सिक्सरकिंग युवराजचा तो जुना अवतार पाहायला मिळाला. युवीच्या फटकेबाजीच्या जोरावर टोरांटो नॅशनल संघाने 7 बाद 216 धावांचा डोंगर उभा केला. युवीनं फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली. पण, संघाला विजय मिळवून देण्यात यो अपयशी ठरला.
'युनिव्हर्सल बॉस'ची वादळी खेळी; 12 षटकार व 7 चौकारांची आतषबाजी
विनिपेग हॉक्स संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टोरांटो नॅशनल संघाने 19.5 षटकांत 7 बाद 216 धावा कुटल्या. चिराग सुरी व हेनरिच क्लासेन हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रॉड्रीगो थॉमस आणि युवराज सिंग यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीनं 77 धावांची भागीदारी करताना संघाला शतकी वेस ओलांडून दिली. युवीनं 173.08च्या स्ट्राईक रेटनं 26 चेंडूंत 45 धावा चोपल्या. त्यात चार चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. थॉमसने 47 चेंडूंत 65 धावा केल्या, तर किरॉन पोलार्डनं 247.62 च्या स्ट्राईक रेटनं 21 चेंडूंत 52 धावा कुटून काढल्या. त्यात 3 चौकार व 5 षटकार होते.