Join us  

World Cup 2023: "हा फलंदाज 2023 विश्वचषकात भारताचा सलामीवीर असेल", युवराज सिंगने युवा खेळाडूला दिली संधी

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे वनडे मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 3:52 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे वनडे मालिका खेळवली जात आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत यजमान बांगलादेशच्या संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ट्वेंटी-20 विश्वचषक पार पडला. ट्वेंटी-20 विश्वचषकाची स्पर्धा पार पडल्यानंतर सर्व संघ आगामी वनडे विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. खरं तर आयसीसीचा 2023चा वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. 

भारतीय संघाने शेवटचा 2011 मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता, ज्यामध्ये माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार्‍या या स्पर्धेपूर्वी युवराजने मोठे विधान केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताचा फलंदाज शुबमन गिल संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे त्याने म्हटले आहे. 

युवराज सिंगने युवा खेळाडूला दिली संधी "माझ्या मते शुबमन खूप चांगली कामगिरी करत आहे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. मला विश्वास आहे की तो 2023 च्या विश्वचषकात भारतासाठी तो सलामीचा प्रबळ दावेदार आहे. शुबमन खूप मेहनती आहे आणि सर्व योग्य गोष्टी करत आहे. तो पुढील दहा वर्षांत स्वत:ला मोठ्या स्तरावर नेईल", असे युवराज पीटीआयशी बोलताना म्हटले. शुबमन गिलने आतापर्यंत 15 वनडे सामने खेळले असून सलामीवीर फलंदाजाने 57.25 च्या सरासरीने 687 धावा केल्या आहेत.  

देशातील खेळासाठी मदत करणार - युवराज 2007 आणि 2011च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा हिस्सा असलेल्या युवराजने आणखी म्हटले, "भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही पण देशातील खेळांच्या वाढीसाठी मी मदत करू शकलो तर त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. पण हे फक्त क्रिकेटच नाही, तर मला या देशातील इतर खेळांच्या वाढीसाठी देखील मदत करायची आहे." असे युवराज सिंगने अधिक म्हटले. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :युवराज सिंगशुभमन गिलआयसीसीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App