नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आता काही दिवसांमध्ये युवराज धक्कादायक खुलास करणार असल्याची चर्चा आहे.
युवराजने भारताला बरेच विजय मिळवून दिले. 2011च्या विश्वविजयात तर युवराजचा सिंहाचा वाटा होता. कर्करोग झाल्यावरही युवराज मैदानात परतला होता. पण युवराजला मात्र निवृत्तीचा सामना खेळायला दिला नाही. त्यामुळे युवराज नाराज आहे. आपल्याला निवृत्तीचा सामना कोणामुळे खेळायला मिळाला नाही, या गोष्टीचा खुलासा युवराज येत्या काही दिवसांमध्ये करणार आहे.
युवराज सिंगनं घेतली शोएब अख्तरची फिरकी; म्हणाला...
अॅशेस कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला जायबंद केले. जोफ्रानं टाकलेला बाऊंसरवर स्मिथला दुखापत झाली आणि त्याला कसोटीतून माघार घ्यावी लागली. शिवाय स्मिथच्या तिसऱ्या कसोटीतही खेळण्याची शक्यताही फार कमी आहे. त्यामुळे फलंदाजांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आर्चरवर टीका केली. स्मिथ वेदनेने कळवळत असताना आर्चरने त्याची विचारपूसही केली नाही, त्यावरून अख्तरने आर्चरचे कान टोचले.
आर्चरने ट्विट केले की,''बाऊंसर हा या खेळातील भागच आहे. पण, जेव्हा आपल्या गोलंदाजीवर फलंदाज जखमी होतो, तेव्हा त्याची विचारपूस करण्याचा मोठेपणा त्या गोलंदाजाने दाखवायचा असतो. पण, आर्चरने तसे केले नाही. स्मिथ वेदनेनं कळवळत असताना आर्चर तेथून निघून गेला. माझ्या गोलंदाजीवर असे घडत होते, तेव्हा मी त्वरीत फलंदाजाकडे धाव घ्यायचो आणि विचारपूस करायचो.''
शोएबच्या या ट्विटनंतर भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने चांगलीच फिरकी घेतली. त्यानं लिहिले की,''हो तू धावत फलंदाजाकडे यायचास, परंतु तू तेव्हा विचारपूस करण्यापेक्षा अजून असे बाऊंसर येतील असेच सांगायचास.''
Web Title: Yuvraj Singh will make shocking revelations in a few days
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.