ब्रेम्पटन (कँनडा) - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा भारताचा सिक्सर किंग युवराज सिंह सध्या कँनडामधील ग्लोबल टी-20 लीगमध्ये तुफानी फटकेबाजी करत आहे. शनिवारी टोरँटो नँशनल्स संघाकडून खेळताना युवीने 22 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळी केली. युवीच्या या खेळीमध्ये तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.
टोरँटो नँशनल्स आणि ब्रेम्पटन वुल्व्स यांच्यात झालेल्या लढतीमध्ये ब्रेम्पटन वुल्व्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 6 बाद 222 धावा फटकावल्या. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना टोरँटो नँशनल्स संघाचा कर्णधार युवराज सिंह याने तुफानी फटकेबाजी केली. मात्र युवीच्या फटकेबाजीनंतरही टोरँटो नँशनल्स संघाला 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. टोरँटो नँशनल्स संघाला 20 षटकात 7 बाद 211 धावांपर्यंच मजल मारता आली.
यापूर्वी युवराजने विनिपेग हॉक्स संघाविरुद्ध 29 जुलै रोजी 26 चेंडूत 45 धावा फटकावल्या होत्या. मात्र त्या लढतीतही युवीच्या संघाला पराभव पत्करावा लागला होता.