युवराज सिंगचा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी भावनिक मॅसेज; पाहा व्हिडीओ 

इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 2019च्या मोसमात युवराज सिंग मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 02:24 PM2018-12-22T14:24:35+5:302018-12-22T14:24:53+5:30

whatsapp join usJoin us
Yuvraj Singh's emotional message to fans of Mumbai Indians; Watch video | युवराज सिंगचा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी भावनिक मॅसेज; पाहा व्हिडीओ 

युवराज सिंगचा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी भावनिक मॅसेज; पाहा व्हिडीओ 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 2019च्या मोसमात युवराज सिंगमुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने एक कोटींच्या मूळ किमतीत युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानीने दाखवलेल्या विश्वासावर युवराजला खरे उतरायचे आहे. युवराजही या आव्हानासाठी सज्ज आणि त्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक भावनिक मॅसेज पाठवला आहे. मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात युवराजने त्याच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 

युवराजला संघाचा सदस्य करून घेतल्यानंतर आकाश अंबानीने दहा वर्षांपासून युवीला घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, असे सांगितले. त्यावर युवी म्हणाला,''माझे स्वागत करणारा आणि नेहमी सहकार्य करणाऱ्या संघाकडून मला खेळायचे होते आणि मुंबई इंडियन्सने ते स्वप्न पूर्ण केले. आकाशने माझ्याप्रती व्यक्त केलेले मत, हे उत्साह वाढवणारे आहे. या संधीचं सोनं करण्याचा निर्धार आहे. दहा वर्षे मी मुंबईत राहिलो आहे आणि मला या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.'' 

मुंबईशी युवराजचे एक वेगळेच नातं आहे. 2011च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत वानखेडे स्टेडियमवर भारताने बाजी मारली होती. 37 वर्षीय युवराजसाठी हे दुसरं घर आहे. तो म्हणाला,'' वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक उंचावताना स्वप्नपूर्ती झाली होती. आम्हाला सचिन तेंडुलकरसाठी विश्वचषक जिंकायचा होता आणि तो क्षण खूपच भावनिक होता आणि त्याचे प्रत्येक भारतीय खेळाडूच्या मनात वेगळे स्थान आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांसमोर पुन्हा तो क्षण अनुभवण्यासाठी मी उत्सुक आहे.'' 



आयपीएलमध्ये युवराज आतापर्यंत डेव्हिड वॉर्नर आणि आर अश्विन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला आहे. आता तो भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यास सज्ज आहे. 

 

Web Title: Yuvraj Singh's emotional message to fans of Mumbai Indians; Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.