महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधला एक दिग्गज खेळाडू आहे. पण, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी माजी कर्णधारावर नेहमी टीका केली आहे. युवराजला यशस्वी खेळाडू बनवण्यामागे योगराज यांचे मोठं योगदान आहे. पण, त्यांनी युवराजच्या संघाबाहेर होण्याला धोनी कारणीभूत असल्याची टीका अनेकदा केली. यावेळी योगराज यांनी कॅप्टन कूल धोनीसह सध्याचा कर्णधार विराट कोहली याच्याबद्दलही मोठं विधान केलं आहे. या दोघांनी युवराजचा विश्वासघात केल्याचा आरोप, योगराज यांनी केला.
युवराजनंही नुकतंच एक विधान केलं होतं. त्यात त्यानं म्हटलं होतं की,''सौरव गांगुली ज्या प्रकारे माझ्या पाठीशी उभा राहीला, तसा पाठिंबा मला विराट कोहली आणि धोनीकडून मिळाला नाही.'' या संदर्भात News24शी बोलताना योगराज यांनी धोनी व कोहलीवर टीका केली. ते म्हणाले,''धोनी आणि कोहलीसह निवड समितीनंही युवराजचा विश्वासघात केला. नुकतीच माझी रवी शास्त्रीसोबत भेट झाली. मी तेव्हा त्यांना सांगितले की प्रत्येक खेळाडूला त्याच्या कामगिरीनुसार निरोप समारंभ दिला पाहिजे. धोनी, कोहली किंवा रोहित जेव्हा निवृत्त होतील, तेव्हा त्यांना सन्मानजक निवृत्ती द्या. भारतीय क्रिकेटसाठी त्यांचे योगदान अमुल्य आहे. युवराजला अनेकांनी फसवलं आणि ती खंत कायम राहील.''
10 जून 2019मध्ये युवराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. योगराज यांनी भारतीय संघाचे माजी निवड समिती सदस्य शरणदीप सिंग यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी बीसीसीआयलाही धारेवर धरले. ते णाले,''शरणदीप सिंगनं अचानक बैठक बोलावली आणि युवीला वगळलं पाहीजे असा प्रस्ताव ठेवला. या लोकांना क्रिकेटची ABC पण माहीत नाही, अशांची निवड समितीवर नेमणूक होते. त्यामुळे अशा लोकांकडून काय अपेक्षा करू शकतो? तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, त्यानं अधिक दुःख होते.''
धोनीनं सुरेश रैनाला अधिक पाठींबा दिला, असेही युवीनं म्हटलं होतं. त्यावर योगराज म्हणाले,''यात नवीन काय आहे? अनेक जण हेही म्हणायचे की रैना असताना टीम इंडियाला युवीची गरज नाही, यात किती तथ्य हे मलाही माहीत नाही. पण, युवीनंही अनेकदा असे सांगितले आहे.''
Handwara Militant Attack: जवाब जरूर मिलेगा; बबिता फोगाटचा दहशतवाद्यांना इशारा
1992 नंतर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकू नये, ही तर Wasim Akramची इच्छा; माजी कर्णधाराची टीका
2011चा वर्ल्ड कप 'या' खेळाडूमुळे जिंकलो; Suresh Rainaचा मास्टर स्ट्रोक
Corona Virus : 7 वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला WWE स्टार जॉन सीनानं दिलं सरप्राईज
वर्ल्ड कपनंतर MS Dhoni लाच क्रिकेटपासून दूर रहायचं होतं; माजी निवड समिती प्रमुखाचा दावा
Web Title: Yuvraj Singh's father Yograj has once again hit out at MS Dhoni along with Indian captain Virat Kohli svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.