मुंबई : युवराज सिंगने निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, आशीष नेहरा यांच्यासह एक नाव असं होतं की ते नसतं तर सर्वांना आश्चर्य वाटलं असतं. ते नाव म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर... लहानपणापासून ज्याला आदर्श मानलं त्याच्यासोबत खेळण्याची संधी मला मिळाली. त्याच्यासोबत वर्ल्ड कप उंचावण्याचा मान युवीला मिळाला. त्यामुळे वर्ल्ड कपमधून निवृत्ती होण्यापूर्वी युवीनं आवर्जुन तेंडुलकरचा सल्ला घेतला. निवृत्तीचा निर्णय तुझ्यावर आहे, लोकांकडे लक्ष नको देऊस, हा सल्ला तेंडुलकरने त्याला दिला.
भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. युवीनं 40 कसोटी सामन्यांत 33.92 च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 304 सामने आहेत आणि त्यात त्याने 36.55च्या सरासरीनं 8701 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 विकेट्सही आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.