युजवेंद्र चहलनं घेतली रोहित शर्माची फिरकी; बीसीसीआयला विचारला प्रश्न

भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:15 PM2019-08-07T16:15:51+5:302019-08-07T16:16:32+5:30

whatsapp join usJoin us
yuzvendra chahal ask question to BCCI; troll Rohit Sharma | युजवेंद्र चहलनं घेतली रोहित शर्माची फिरकी; बीसीसीआयला विचारला प्रश्न

युजवेंद्र चहलनं घेतली रोहित शर्माची फिरकी; बीसीसीआयला विचारला प्रश्न

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने मैदान मारले. विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करून संघाचा विजय पक्का केला.

147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( 3) लगेच माघारी परतला. लोकेश राहुलही 20 धावा करून बाद झाला. पण, कोहली आणि पंत यांनी संघाचा विजय पक्का केला. कोहलीनं 45 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या, तर पंतने 42 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 65 धावांची खेळी केली. या सामन्यात विश्रांती मिळालेल्या रोहित शर्मानं मॅच संपल्यानंतर बीसीसीआयच्या टीव्हीवर एन्ट्री घेतली. त्यानं सामन्यानंतर रिषभ पंतची मुलाखत घेतली आणि त्यावरून फिरकीपटू युजवेंद्र चहलने हिटमॅनची फिरकी घेत बीसीसीआयला प्रश्न विचारला.


या व्हिडीओची सुरुवात करताना रोहितनं पंतचे नाव रिषभ संथ असे घेतले. त्याने त्वरीत ती चूक सुधारली. त्यानंतर प्रश्न उत्तराचा खेळ रंगला. पण, रोहितची ही चूक चहलनं पकडली. त्यानं त्वरित बीसीसीआयला प्रश्न विचारला... त्यानं लिहिलं की माझी उणीव जाणवतेय का?

बीसीसीआयनंही त्याच्या या प्रश्नाचे त्वरित उत्तर दिले.

रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रम
पंतने नाबाद 65 धावांच्या खेळीसह धोनीचा विक्रम मोडला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा धोनीचा विक्रम काल मोडला गेला. धोनीनं 2017मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध 56 धावांची खेळी केली होती. भारतीय यष्टिरक्षकाची ती सर्वोत्तम खेळी होती. पण, पंतने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 65 धावा करून हा विक्रम मोडला. 

Web Title: yuzvendra chahal ask question to BCCI; troll Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.