Yuzi T Shirt Special Message, Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि मॉडेल-डान्सर धनश्री वर्मा या दोघांच्या घटस्फोटावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाल्यानंतर जून २०२२ पासून हे दोघे विभक्त राहत होते. गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहिल्यानंतर आज ते कायदेशीररित्या लग्नाच्या बंधनातून मुक्त झाले. मुंबईतील वांद्रे येथील फॅमिली कोर्टात युजवेंद्र - धनश्री यांच्या घटस्फोटावर अंतिम निकाल देण्यात आला. वकिलांनी बाहेर येऊन याबाबत माहिती दिली. यावेळी युजवेंद्र चहलदेखील त्यांच्यासोबत होता. त्याने यावर मौन बाळगले, पण त्याच्या टीशर्ट वर असलेल्या स्पेशल मेसेजची चांगलीच चर्चा रंगली आहे.
टी-शर्ट वर काय लिहिलंय? त्याचा अर्थ काय?
आज वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात युजवेंद्र चहल आला तेव्हा त्याने घातलेल्या टी-शर्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. युजवेंद्र चहलने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. त्या टी-शर्टवर लिहिले होते, 'बी यूर ओन शुगर डॅडी' (Be Your Own Sugar Daddy). नेटकऱ्यांच्या मते, हा स्पेशल मेसेज धनश्री वर्मासाठी असावा. चहलने घटस्फोटानंतर धनश्रीला एकूण ४.७५ कोटी रूपये देण्याचे कबूल केले आहे. तसेच, हे दोघे गेली अडीच वर्षे एकमेकांपासून विभक्त राहत होते. त्यामुळे या मेसेजमागे आर्थिक अँगल असल्याचे बोलले जात आहे. आपल्या जर काही अवास्तव गरजा असतील, तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वत: तितके पैसे कमवा आणि स्वत:साठी खर्च करा, दुसऱ्यांना त्याचा त्रास किंवा भार देऊ नका, असा या मेसेजचा अर्थ असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
युजवेंद्र चहलकडून धनश्री वर्माला मिळणार ₹४.७५ कोटी, पाहा कोणते आहेत जगातील सर्वात महागडे घटस्फोट?
कोर्टाबाहेर आल्यानंतर वकिल काय म्हणाले?
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा लग्नानंतर ४ वर्षांनी विभक्त झाले आहेत. बांद्रा येथील कौटुंबिक न्यायालयाबाहेर वकिलांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. युजवेंद्र चहल याची बाजू मांडणारे वकिल नितीन कुमार गुप्ता यांनी सांगितले, "घटस्फोटाचा अंतिम निकाल देण्यात आला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे म्युच्यूयल डिव्होर्स साठी अर्ज केला होता. आज त्यावर घटस्फोटाचा हुकूमनामा ( Divorce Decree) देण्यात आला आहे. आज या दोघांचे लग्न कायदेशीरपणे संपुष्टात आले आहे. आता ते दोघे त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी एकमेकांपासून स्वतंत्र आहेत." यानंतर पत्रकारांनी त्यांना पोटगीचा प्रश्न विचारला. यावर 'काहीच नाही' म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.