भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल हा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्यासंदर्भात सोशल मीडियावर बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. खरेतर, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा बऱ्याच दिवसांपासून कॅमेऱ्यासमोर दिसलेले नाहीत. यामुळे हे दोघेही लवकरच वेगळे होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
महत्वाचे म्हणजे, या जोडप्याने यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. मात्र, धनश्री वर्मा बऱ्याच दिवसांपासून तिच्या खराब नात्यासंदर्भात हिंट देत आहे. आता चहलनेही सोशल मीडियावर एक मोठी हिंट दिली.
खरंच वेगळे होणार आहेत धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल?
खरे तर, गेल्या 22 डिसेंबरला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. मात्र, या दोघांनीही सोशल मीडियावर ना कुठली पोस्ट शेअर केली, ना कुठली इन्स्टाग्राम स्टोरी टाकली. महत्वाचे म्हणजे, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघेही सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असतात. धनश्री तर तिच्या जवळपास सर्वच अॅक्टिव्हिटी सोशल मीडियावर शेअर करत असते. पण, लग्नाच्या वाढदिवशी दोघांनीही एकही पोस्ट शेअर न करणे, दोघांमध्ये काही तरी गडबड असल्याचे दर्शवते अन्यथा एवढा मोठा आणि विशेष दिवस कुणीही विसरू शकत नाही.
विशेष म्हणजे, (14 नोव्हेंबर)नंतर युजवेंद्र चहलने धनश्री वर्माच्या कुठल्याही पोस्टला लाइक अथवा त्यावर कमेंट केलेली नाही. धनश्री वर्मासंदर्भात बोलायचे तर ती सध्या तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती लवकरच तेलुगु चित्रपटात दिसणार आहे.