Join us

युझवेंद्र चहल अखेर व्यक्त झाला, म्हणाला- "जेव्हा ते घडलं, तेव्हा मी मनाला विचारलं..."

Yuzvendra Chahal, IPL 2025 : चहल काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 10:46 IST

Open in App

Yuzvendra Chahal, IPL 2025 : भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. चहलला गेल्या दीड-दोन वर्षात भारतीय संघात स्थान मिळालेले नाही, तरीही तो चर्चेत आहे. त्यामागचे एक कारण म्हणजे त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि पत्नी विभक्त ( Chahal Dhanashree Divorce ) होण्याच्या चर्चा. चहल हा त्याची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) हिच्याशी घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या दोघांनी अद्याप या मुद्द्यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. पण चर्चांमध्ये तथ्य असल्याचे काही बाबींमध्ये दिसून आले आहे. तशातच चहल आणखी एका गोष्टीमुळे चर्चेचा भाग ठरला. चहलला IPL Auction 2025 मध्ये पंजाब किंग्ज ( Punjab Kings ) संघाने १८ कोटी ५० लाखांची बोली लावून विकत घेतले. याबाबत चहलने वक्तव्य केले आहे.

युजवेंद्र चहलने नुकतीच एचटीला मुलाखत दिली. त्यात तो लिलावाबाबत बोलला. "मी नर्व्हस होतो, त्यामुळे लिलावाचा सुरवातीचा टप्पा पाहू शकलो नाही. लिलावात तुम्ही काही अंदाज लावू शकत नाही. तुम्हाला कोण विकत घेईल, तुमची किंमत किती ठरेल याचा आपल्याला काहीच अंदाज नसतो. तुमच्या डोक्यात विविध विचार सुरू असतात. मला पंजाबने खरेदी केल्याचा आनंद आहे कारण माझं घर जवळच आहे. पण माझ्यावर १८.५० कोटींची बोली लागली तेव्हा मी माझ्या मनाला प्रश्न विचारला  की, माझी त्या किमतीला न्याय देऊ शकतो का? त्यावर उत्तर मिळाले- 'हो." अशा शब्दांत युजवेंद्र चहलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, चहल IPL मधील यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला राजस्थानचा संंघ रिटेन करेल असा अंदाज होता, पण तसे घडले नाही. त्याला संघाने करारमुक्त केले. त्यामुळे तो लिलावात उतरला आणि त्याला १८ कोटी ५० लाखांचा तगडा भाव मिळाला. त्यामुळे यंदा तो प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जकडून खेळणार आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सयुजवेंद्र चहलराजस्थान रॉयल्स