Join us  

टीम इंडियाच्या बसमध्ये सुंदर तरुणी, युझवेंद्र चहलने केला पार्टनर म्हणून उल्लेख, कोण आहे ती? 

Yuzvendra Chahal : फिरकीपटू युझवेंद्र चहल याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्रॅव्हल पार्टनर म्हणून उल्लेख करत एका तरुणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून क्रिकेटप्रेमी अवाक झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 11:40 AM

Open in App

रायपूर येथे झालेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवून भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आता इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडवर निर्विवाद वर्चस्व राखण्याचा भारतीय संघाचा इरादा असेल. या सामन्यासाठी भारतीय संघ इंदूर येथे दाखल झाला आहे. या प्रवासादरम्यान, फिरकीपटू युझवेंद्र चहल याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका तरुणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून क्रिकेटप्रेमी अवाक झाले आहेत. या फोटोमध्ये टीम इंडियाच्या बसमध्ये एकच तरुणी दिसत आहे. तिचा फोटो शेअर करत ती आपली ट्रॅव्हल पार्टनर असल्याचे चहलने म्हटले आहे. त्यामुळे ही तरुणी कोण याचा शोध अनेकांनी घेतला. मात्र जेव्हा त्यामागचं सत्य समजलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

टीम इंडियातील फिरकीपटू युझवेंद्र चहल हा त्याच्या गमतीदार स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तो नेहमीच सहकारी खेळाडूंसोबत मौजमस्ती करत असतो. आताही चहलने असंच काही केलं. त्याने तरुणी म्हणून जो फोटो शेअर केला होता तो प्रत्यक्षात कुलदीप यादव याचा होता. फिल्टरचा वापर करून युझवेंद्र चहलने हा फोटो महिलेच्या रूपात बदलला होता. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दरम्यान, हा फोटो शेअर करून चहने अनेकांची फिकरी घेतली आहे.

दरम्यान, रायपूर वनडेपूर्वी बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये चहल ड्रेसिंग रूममध्ये मौजमजा करताना दिसत आहे. चहलने सर्वप्रथम रोहित शर्माला ड्रेसिंग रूमममध्ये बसलेलं दाखवलं. त्याने व्हिडीओमध्ये सांगितले की, रोहितसोबत विराट कोहली आणि उपकर्णधार हार्दिक पांड्याची सिट आहे. त्यानंतर त्याने इशान किशनकडे कॅमेरा वळवत त्याला द्विशतकाबाबत विचारले. तसेच त्याने फू़ड मेन्यूचीही माहिती दिली. रोहितने त्याची गंमत करताना तुझं भविष्य चांगलं असल्याचं सांगितलं. त्यावर चहलही मनमोकळेपणाने हसला.  

टॅग्स :युजवेंद्र चहलभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ
Open in App