श्रीलंकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलला आशिया चषकाच्या संघात स्थान मिळालं नाही. तर लोकेश राहुलला पाकिस्तान आणि नेपाळविरूद्धच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. संघाबाहेर असलेले हे क्रिकेटपटू धार्मिक स्थळांना भेट देत असल्याचे दिसते. युझवेंद्र चहलनं मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांची भेट घेतली. तसेच त्यांना भेटण्यासाठी पुन्हा येणार असल्याचं त्यानं सांगितलं.
दरम्यान, लोकेश राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी व्हॅली सुब्रमण्य स्वामी मंदिराला भेट दिली. राहुल आणि अथिया शेट्टीचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर, युझवेंद्र चहलनं त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केलं आहेत.
तसेच बागेश्वर धामला भेट देऊन आनंद झाला असल्याचं चहलनं सांगितलं. "इथे आल्यावर प्रसन्न वाटतं... खूप वर्षापासून मी धीरेंद्र शास्त्री यांना ओळखतो. यापूर्वी मी त्यांना टीव्हीवर पाहायचो, पण आता प्रत्यक्षात भेटून आनंद झाला. सर्वांना खुश ठेवण्याचे ते काम करतात", असं चहलनं यावेळी सांगितलं.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन)
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल