Join us  

Yuzvendra Chahal Mumbai Indians: युजवेंद्र चहलने आरोप केलेल्या मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची होणार चौकशी; रूममध्ये बांधून ठेवून तोंडाला पट्टी लावल्याचा केला होता आरोप

तोंडाला टेप लावून खूर्चीत बांधून ठेवल्याचा चहलने केला आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 4:22 PM

Open in App

Yuzvendra Chahal Mumbai Indians: भारतीय लेग स्पिनर युजवेंद्र चहलच्या खुलाशानंतर, कौंटी संघ डरहॅमने स्पष्ट केलं आहे की त्यांचे मुख्य प्रशिक्षक आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू जेम्स फ्रँकलिन यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची वैयक्तिकरित्या चौकशी केली जाणार आहे. एका पॉडकास्टमध्ये, चहलने २०११ मधील एक प्रसंग सांगितला होता. त्यात मुंबई इंडियन्सचे (MI) संघ सहकारी जेम्स फ्रँकलिन आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सने यांनी चॅम्पियन्स लीग फायनलचा विजय साजरा करताना चहलशी गैरवर्तणूक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, डरहॅमने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, "आम्हाला २०११ च्या एका घटनेच्या अलीकडील अहवालाची माहिती आहे. आमच्या कोचिंग स्टाफच्या एका सदस्याचे त्यात नाव आहे. आमच्या कर्मचार्‍यांशी संबंधित कोणत्याही मुद्द्यांवर वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी क्लबची समिती वैयक्तिकरित्या त्याची चौकशी करेल."

जेम्स फ्रँकलिन २०११ ते २०१३ या काळात मुंबई इंडियन्सचा भाग होता. २०१९ च्या सुरुवातीला त्याची डरहॅमचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, चहलने असा आरोपही केला होता की, या दोघांनी त्याचे तोंड टेपने बंद केले होते आणि त्याला रात्री खोलीत एकटे सोडले होते. चहल म्हणाला होता, "२०११ मध्ये मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग जिंकली तेव्हा आम्ही चेन्नईमध्ये होतो. सायमंड्सने खूप 'फ्रूट ज्यूस' प्यायला होता. त्यावेळी त्याने आणि जेम्स फ्रँकलिनने माझे हात-पाय बांधले आणि म्हणाले की आता तू यातून सुटून दाखव. ते लोक खूप नशेत होते. त्यांनी माझं तोंड टेपने बंद केलं आणि ते निघून गेले. नंतर सफाई कर्मचाऱ्यांनी मला यातून सोडवलं."

टॅग्स :आयपीएल २०२२युजवेंद्र चहलमुंबई इंडियन्स
Open in App