मुंबई- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल व कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. आयपीएल संपल्यावर चहल व तनिष्का लग्न करणार याबद्दलच्या बातम्यांना सगळीकडे उधाण आलं होतं. पण आता या वृत्तावर युजवेंद्रने पूर्णविराम दिला आहे. ट्विट करत युजवेंद्रने लग्नाबाबतचा खुलासा केला आहे.
'माझ्या खासगी आयुष्यात सध्या काहीही सुरू नाही. मी अजिबात लग्नबंधनात अडणार नाही. मी आणि तनिष्का खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे सर्वाना, मीडियाला व माझ्या चाहत्यांना विनंती आहे की माझ्या लग्नाबद्दलच्या बातम्या पसरवू नका. माझ्या प्रायव्हसीचा तुम्ही सगळे आदर कराल ही अपेक्षा. अफवा पसरवणं बंद करा. माझ्या लग्नाबाबतच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. त्यामुळे काहीही पोस्ट करण्याआधी ते तपासून पाहा', असं युजवेंद्रने ट्विट करत म्हटलं. युजवेंद्रच्या ट्विटमुळे त्याच्या लग्नाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार युजवेंद्र चहल कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरला डेट करत असून ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होती. चहल सध्या आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळण्यात व्यस्त आहे. पण त्यानंतर युजवेंद्र चहल व तनिष्का कपूर लग्न करणार असल्याची चर्चा होती पण त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
Web Title: Yuzvendra Chahal Opens Up About His marriage rumour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.