युजवेंद्र चहलच्या इस्टा स्टोरीवर दुसरीच मुलगी? RRच्या खेळाडूचा फोटो पाहून फॅन्स चक्रावले

राजस्थान रॉयल्सचा  ( RR) फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) हा सोशल मीडियावर फारच अॅक्टीव्ह असतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 05:48 PM2023-05-16T17:48:39+5:302023-05-16T17:48:50+5:30

whatsapp join usJoin us
Yuzvendra Chahal posts rib-tickling picture of Yashasvi Jaiswal in female avatar ahead of clash against Punjab | युजवेंद्र चहलच्या इस्टा स्टोरीवर दुसरीच मुलगी? RRच्या खेळाडूचा फोटो पाहून फॅन्स चक्रावले

युजवेंद्र चहलच्या इस्टा स्टोरीवर दुसरीच मुलगी? RRच्या खेळाडूचा फोटो पाहून फॅन्स चक्रावले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजस्थान रॉयल्सचा  ( RR) फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) हा सोशल मीडियावर फारच अॅक्टीव्ह असतो... RRच्या सोशल मीडिया हँडलवरही चहलचे अनेक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात... मनमिळावू, मस्तीखोर स्वभावाच्या चहलने मंगळवारी त्याच्या इस्टा स्टोरीवर यशस्वी जैस्वालचा मजेशीर फोटो पोस्ट केला. AI तंत्रज्ञानाचा वापर करून चहलने RRच्या सलामीवीराचा मुलीच्या अवतारातील फोटो पोस्ट केला आहे आणि फॅन्स चक्रावले आहेत. राजस्थानचा शुक्रवारी धर्मशाला येथे पंजाब किंग्सविरुद्ध सामना होणार आहे. 

चहलने याआधीही त्याचा मित्र व भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याचाही मुलीच्या अवतारातील फोटो पोस्ट केला होता. चहलने यंदाच्या पर्वात १३ सामन्यांत २१ विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसरे स्थान पटकावले आहे. मोहम्मद शमी व राशीद खान प्रत्येकी २३ विकेट्ससह आघाडीवर आहेत. यशस्वीने यंदाच्या पर्वात १३ सामन्यांत ४७.९२ च्या सरासरीने ५७५ धावा केल्या आहेत.  

RCB विरुद्धच्या पराभवामुळे RRला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूने ११२ धावांनी हा सामना जिंकला आणि RRला ५९ धावांवर गुंडाळले. राजस्थान १३ सामन्यांत १२ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांचा नेट रन रेट ०.१४० असा आहे. दुसरीकडे पंजाब किंग्सचेही १२ गुण आहेत, परंतु त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. 

Web Title: Yuzvendra Chahal posts rib-tickling picture of Yashasvi Jaiswal in female avatar ahead of clash against Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.