HBD Yuzvendra Chahal, wife Dhanashree Verma wish: भारतीय संघाचा प्रतिभावान फिरकीपटू युजवेंद्र चहल याचा आज वाढदिवस. युजवेंद्र चहल याने भारतीय संघासाठी पदार्पण केल्यापासून अनेकदा संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. २३ जुलै १९९० साली जन्मलेल्या युजवेंद्र चहलने २०१६ साली पदार्पण केले. टी२० वर्ल्ड २०२२ मध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये त्याला संघात स्थान मिळाले पण प्लेइंग ११ मध्ये खेळता आले नाही. या सर्व चढउतारांमध्ये त्याला साथ देणाऱ्या पत्नी धनश्री वर्मा हिने आपल्या नवऱ्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर तिने चहल आणि तिचे ४ खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोसोबत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'महान फिरकीपटू आणि विजेता. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तू सतत झगडत असतोस आणि तुझ्या प्रतिभेने तु मैदानावर किमया घडवतोस. तुझ्या या स्वभावाचे मला कौतुक वाटते. देवाची तुझ्यावर अशीच कृपादृष्टी राहू दे. मी तुला कायमच पाठिंबा देईन आणि तुझी चीअरलीडर म्हणून कायम सोबत असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा"
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचे लग्न २२ डिसेंबर २०२०मध्ये झाले. कोरोनाकाळात चहलने डान्सचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यासाठी क्लास लावला होता. त्याची शिक्षिका असलेल्या धनश्रीवर त्याचे प्रेम जडले आणि त्यांनी लग्न केले. धनश्री बहुतांश क्रिकेट सामन्यात चहलला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असते. मधल्या काळात धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चहल हे अडनाव काढले होते. तेव्हा त्यांच्यात खटके उडत असल्याची चर्चा रंगली होती. पण त्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे दिसले. अजूनही चहल आणि धनश्री एकत्र सुखाने संसार करत असून नात्यामध्ये एकमेकांचा आदर करताना दिसतात.