Join us  

Yuzvendra Chahal Record, IPL 2022 SRH vs RR: Virat Kohli ने संघातून बाहेर केलेल्या युजवेंद्र चहलची मोठी कामगिरी; पहिल्याच सामन्यात केला 'हा' पराक्रम

युजवेंद्र चहल 'हा' विक्रम करणारा केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 1:26 PM

Open in App

Yuzvendra Chahal Record, IPL 2022 SRH vs RR: सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६१ धावांनी मोठा विजय मिळवला. संजू सॅमसनचं कर्णधारापदाला साजेसं अर्धशतक आणि त्यानंतर प्रसिध कृष्णा, युजवेंद्र चहल यांची अचूक वेध घेणारी गोलंदाजी याच्या बळावर राजस्थानने हैदराबादला सहज धूळ चारली. विराट कोहलीच्या RCB ने करारमुक्त केलेले दोनही खेळाडू राजस्थानच्या ताफ्यात येताच चमकले. प्रसिध कृष्णा २ तर चहलने ३ बळी टिपत विजयात मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीच्या (Virat Kohli) च्या RCB ने नाकारलेल्या युजवेंद्र चहलने राजस्थानकडून पहिलाच सामना खेळत असताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

युजवेंद्र चहलने मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघाचे तीन बळी अवघ्या २२ धावांमध्ये टिपले. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि नव्या दमाचा अब्दुल समद यांना त्याने स्वस्तात बाद केलं. रोमारियो शेपर्ड वेगाने धावा करत होता. पण त्यालाही युजवेंद्र चहलने आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुंडाळत IPL मध्ये २५० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. या स्पर्धेत २५० बळी घेणारा तो चौथा भारतील गोलंदाज ठरला. याआधी अमित मिश्रा, पियुष चावला आणि आर अश्विन या तिघांनी हा पराक्रम केला होता. त्यानंतर चहलने ही किमया साधली.

दरम्यान, सामन्यात सॅमसनचे अर्धशतक आणि देवदत्त पडीकल (४१), जोस बटलर (३५) आणि शिमरॉन हेटमायर (३२) यांच्या धडाकेबाज फटकेबाजीमुळे राजस्थानने द्विशतकी मजल मारली. २११ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन अतिशय स्वस्तात बाद झाला. त्या धक्क्यातून हैदराबादला सावरताच आलं नाही. त्यांची अवस्था १० षटकांत ३७ धावांत ५ बळी अशी होती. त्यानंतर एडन मार्क्रमने झुंज देत नाबाद अर्धशतक ठोकलं. त्याने ५ चौकार आणि २ षटकार खेचत नाबाद ५७ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने तुफानी खेळी करत चाहत्यांचे मनोरंजन केलं. सुंदरने १४ चेंडूत ४० धावांची खेळी केली. पण तरीही हैदराबादला २० षटकात ७ बाद १४९ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

टॅग्स :आयपीएल २०२२युजवेंद्र चहलराजस्थान रॉयल्सविराट कोहली
Open in App