भारतीय संघातील 'कुलचा' या नावानं प्रसिद्ध असलेली कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही जोडी २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पुन्हा एकत्र खेळताना दिसलेली नाही. जून २०१९मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही दोघं टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अखेरचे दिसले होते. त्या सामन्यात चहलनं १० षटकांत ८८ धावा दिल्या, तर कुलदीपननं ७२ धावा देत १ विकेट घेतल्या. रवी शास्त्री यांनी कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला दिला त्रिसूत्री मास्टरप्लान!
स्पोर्ट्स तकशी बोलताना चहलनं कुलदीपसोबत एकत्र का खेळत नसल्याचा खुलासा केला. आम्ही दोघं एकत्र खेळण्यापेक्षा संघातील संतुलन महत्त्वाचे आहे, असे चहलनं सांगितले. रवींद्र जडेजा संघात परतल्यानंतर संघात ऑलराऊंडर फिरकीपटू परतला आणि त्यामुळे मर्यादित षटकांच्या सामन्यात आमच्यापैकी एकाला जाणं भाग होतं, असेही चहलनं स्पष्ट केलं. BCCIला २५०० कोटींची चिंता; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करण्याची ECBला विनंती?
तो म्हणाला,''मी आणि चहल जेव्हा संघात होतो, तेव्हा हार्दिक पांड्या संघात होता आणि तो गोलंदाजी करत होता. २०१८ला हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला आणि रवींद्र जडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून पदार्पण केलं. तो ७व्या क्रमांकावर फलंदाजीही करत होता. दुर्दैवानं तो एक फिरकीपटू आहे. त्यामुळे कुलदीप व मी एकत्र खेळू शकलो नाही. तो मध्यमगती गोलंदाज असता, तर कुलदीप व माझे एकत्र खेळण्याचे चान्सेस वाढले असते.''
''कुलदीप आणि मी एका मालिकेत ५०-५० सामने खेळू शकतो. कधी कधी पाच सामन्यांच्या मालिकेत तो ३ सामने खेळला आहे, तर कधी मला संधी मिळायची. संघाच्या संतुलनासाठी ती गरज होती. ११ खेळाडूंची टीम बनते आणि कुलचा या जोडीनं टीम बनत नाही. हार्दिक असेपर्यंत आम्ही होती, आम्हालाही संधी मिळाल्या. ७व्या क्रमांकावर संघाला अष्टपैलू खेळाडू हवा होता. मी खेळत नसलो तरी संघ जिंकल्यावर मला आनंद होतोच,''असेही चहलनं स्पष्ट केलं.
कुलदीपनं ७ कसोटीत २६, ६३ वन डेत १०५ आणि २१ ट्वेंटी-२०त ३९ विकेट्स घेतल्या आहेत. युजवेंद्रनं ५४ वन डे व ४८ ट्वेंटी-२०त अनुक्रमे ९२ व ६२ विकेट्स घेतल्या आहेत.