"इथं तरी सिक्स मार भाई...", चहलचा गल्ली क्रिकेटमध्ये 'इम्पॅक्ट', राशिद खाननं घेतली फिरकी

युझवेंद्र चहलच्या व्हिडीओवर राशिद खानची भन्नाट कमेंट.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 06:41 PM2023-06-01T18:41:55+5:302023-06-01T18:42:42+5:30

whatsapp join usJoin us
Yuzvendra Chahal shared a video of playing Gully cricket and Rashid Khan made a funny comment | "इथं तरी सिक्स मार भाई...", चहलचा गल्ली क्रिकेटमध्ये 'इम्पॅक्ट', राशिद खाननं घेतली फिरकी

"इथं तरी सिक्स मार भाई...", चहलचा गल्ली क्रिकेटमध्ये 'इम्पॅक्ट', राशिद खाननं घेतली फिरकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा (rajasthan royals) प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो. चहलसाठी आयपीएल २०२३ चा हंगाम शानदार राहिला. या हंगामात त्यानं ड्वेन ब्राव्होचा मोठा विक्रम मोडीत काढला आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर तो सुट्टीचा आनंद घेत आहे. फावल्या वेळात तो गल्ली क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडीओ खुद्द चहलनं शेअर केला आहे.

सहकारी खेळाडूंची नेहमी फिरकी घेणाऱ्या चहलची अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खाननं फिरकी घेतल्याचे दिसते. चहलनं शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळते की, तो चाहत्यांसोबत 'गल्ली क्रिकेट'चा आनंद घेत आहे. चहलने फलंदाजी करताना विविध प्रकारचे शॉट्स खेळले. 'द गल्ली इम्पॅक्ट प्लेयर', असं कॅप्शन चहलनं या व्हिडीओला दिलं आहे. 

राशिद  खाननं घेतली फिरकी
चहलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर स्टार फिरकीपटू राशिद खानची प्रतिक्रिया खूप व्हायरल होत आहे. राशिदने व्हिडीओवर गमतीशीर कमेंट करताना लिहले, "भाई, इथे तरी सिक्स मार." याला प्रत्युत्तर देताना चहलनं सांगितलं, "६ जण आउट आहेत इथं."

चहल सध्या नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आहे आणि त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. अलीकडेच चहलने त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. 

Web Title: Yuzvendra Chahal shared a video of playing Gully cricket and Rashid Khan made a funny comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.