Yuzvendra Chahal Hattrick, IPL 2022 RR vs KKR Live: सोमवारी रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) वर ७ धावांनी विजय मिळवला. जोस बटलरच्या शतकामुळे राजस्थानने २१७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रेयस अय्यरने ८५ आणि फिंचने ५८ धावांची खेळी केली. पण युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी हॅटट्रिक घेत सामना फिरवला. टीम इंडियाचा (Team India) प्रतिभावान लेग स्पिनर युजवेंद्र चहल याने अप्रतिम गोलंदाजी करत हॅटट्रिक घेतली. चहलने पहिल्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरचा बळी टिपला. त्यानंतर मधील दोन चेंडूत फार काही घडलं नाही. त्यानंतर चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यर ८५ धावांवर बाद झाला. पुढच्या चेंडूवर शिवम मावी सीमारेषेवर झेलबाद झाला. तर हॅटट्रिकच्या चेंडूवर पॅट कमिन्स लेग स्पिनला चकून किपरकरवी झेलबाद झाला. पाहा युजवेंद्र चहलची हॅटट्रिक-
पहिल्या चेंडूवर व्यंकटेश अय्यर बाद-
चौथ्या, पाचव्या व सहाव्या चेंडूवर चहलची हॅटट्रिक-
दरम्यान, कोलकाताने राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर देवदत्त पडिकल २४ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर संजू सॅमसन १९ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. पण जोस बटलरने दमदार शतक ठोकले. तो ६१ चेंडूत १०३ धावांवर बाद झाला. २१८ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून श्रेयस अय्यर आणि आरोन फिंच जोडीने १०७ धावांची भागीदारी केली. फिंचने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकत २८ चेंडूत ५८ धावा केल्या. KKR चा कर्णधार श्रेयस अय्यरनेही ५१ चेंडूत ८५ धावा केल्या. पण युजवेंद्र चहलने ४ षटकांत ४० धावा देऊन ५ बळी टिपले आणि राजस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.