Join us  

'आधी माझ्या नवऱ्याला माझ्याकडून हिरावून घेतलंस अन् आता...'; रितिकाची पोस्ट चर्चेत

राजस्थान रॉयल्स संघातून खेळणार युझवेंद्र चहल याने देखील रोहितला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 3:58 PM

Open in App

आज भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा ३६ वाढदिवस असून हिटमॅनने आपला वाढदिवस मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांसोबत साजरा केला. रोहितच्या वाढदिवशीच मुंबईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील १००० वा सामना खेळत आहे.

रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूर येथे झाला. त्याची आई विशाखापट्टणमची आहे. वडील डोंबिवलीत एका छोट्याशा खोलीत राहत असल्याने रोहित शर्मा आजोबा आणि काकांसोबत राहत होता. रोहित शर्माला वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहे. भारतीय संघातील खेळाडू, आजी-माजी क्रिकेटर्सदेखील रोहितला शुभेच्छा देत आहे. 

भारतीय संघाचा फिरकीपटू आणि सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघातून खेळणार युझवेंद्र चहल याने देखील रोहितला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. चहलने रोहितची पत्नी रितिका हिच्या वाढदिवसाची संपूर्ण पोस्ट कॉपी करून ट्विटर आणि इन्स्टावर पोस्ट केली आहे. चहलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले- 'संपूर्ण जगातील माझ्या आवडत्या सर्वात चांगल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..माझा सर्वात चांगला मित्र, जगातील इतरांपेक्षा मला जास्त हसवणारा व्यक्ती.. वाढदिवसाच्या शुभेच्छा रोहित शर्मा, असं म्हणत CC:- रितिका भाभी, असंही चहलने म्हटलं आहे. युझवेंद्र चहलने ज्या पद्धतीने रोहितला शुभेच्छा दिल्या, ते पाहून रोहित शर्माची पत्नी रितीका म्हणाली, ''आधी माझ्या नवऱ्याला हिरावून घेतलंस, त्याप्रमाणे आता माझं कॅप्शनही चोरलं...''

दरम्यान, रोहित शर्माने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने २००७ मध्ये वन डे आणि ट्वेंटी-२० आणि सहा वर्षांनंतर २०१३ मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याने ४९ कसोटी, २४३ वन डे आणि १४८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. यासोबतच रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही सांभाळत असून तो आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा कर्णधार ठरला आहे.

टॅग्स :रोहित शर्मायुजवेंद्र चहलसोशल व्हायरल
Open in App