Join us

चहलवरील 'प्रेम आटलं'...या चर्चेत आता 'भूल भुलैय्या फ्रेम'सह धनश्रीचा 'अब बस करो...' सीन व्हायरल

तिचा लूक एकदम स्टायलिश अन् परफेक्ट, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 21:11 IST

Open in App

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Viral Video : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्स कोरिओग्राफरच्या रुपात लोकप्रिय ठरलेला चेहरा धनश्री वर्मा ही दोन नावे सातत्याने चर्चेत आहेत. दोघांची जोडी फुटली असून ते घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहचलेत, असे बोलले जाते. एका बाजूला या सर्व चर्चा रंगत असताना युजवेंद्र चहल बिग बॉसच्या घरात दिसला. दुसरीकडे आता धनश्री वर्मा टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये जाताना स्पॉट झाली आहे. तिचा ब्लॅक अँण्ड व्हाइट आउटफिट्समधील स्टायलिश लूक अन् कॅमेऱ्यात तिची कैद झालेली कमेंटवाला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एकमेकांवरील प्रेम आटलं नातं तुटलं चर्चेत पहिल्यांदा स्पॉट झाली धनश्री

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात बिनसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. दोघे सोशल मीडियावरील क्रिस्पी पोस्टसह एकमेकांवरील प्रेम आटलं अन् नात तुटलं या नात्यातील दुराव्याच्या गोष्टीला खतपाणी घालत आहेत. दोघांच्यातील प्रकरण गाजत असताना एका बाजूला चहल बिग बॉसच्या घरात झळकला. आता धनश्री वर्माची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. तिचा हा व्हिडिओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. चहलवरील 'प्रेम आटल्या'ची चर्चा रंगत असताना आता 'भूल भुलैय्या फ्रेम'सह धनश्रीचा 'अब बस करो...' हा सीन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.   

लूक एकदम भारी, पण...

धनश्री वर्माचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात तिचा स्टायलिश अंदाज सहज दिसून येतो. ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस अन् त्यावर व्हाइट क्रॉप जॅकेटसह तिने एकदम परफेक्ट लूक मिळवल्याचे दिसते. एन्ट्री मारल्यावर तिने फोटोसाठी पोझही दिल्या. पापाराझींना हायबायही केले. पण ही मंडळी फोटो आणि व्हिडिओ काढायचे काय थांबायचे नावच घेईनात. त्यामुळे धनश्रीनं 'अब बस करो...' अशी कमेंट केली. 

टॅग्स :युजवेंद्र चहलसेलिब्रिटीघटस्फोटऑफ द फिल्ड